बिग बॉसमुळे पुन्हा प्रकाश झोतात आलेल्या Varsha Usgaonkar यांचा कठीण जीवनप्रवास

By Swamini Chougule

Published on:

Varsha Usgaonkar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रील ‛ मी आले निघाले’ असं म्हणत ज्या अभिनेत्रीने स्वतःच्या सौदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने हिंदी आणि मराठी दोन्ही प्रेक्षकांना भुरळ घातली अशी अभिनेत्री म्हणजे Varsha Usgaonkar ! त्यांनी 90 च्या दशकात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला.त्या ‛ सुख म्हणजे नक्की काय असते?’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या माई झाल्या. आत्ता सध्या त्या ‛बिग बॉस सिजन 5’ मुळे चर्चेत आहेत.

Varsha Usgaonkar या सुंदर अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे तर आपण याच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. Varsha Usgaonkar यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 मध्ये उसगाव, गोवा इथे झाला. त्यांचे वडील अच्युत उसगांवकर हे केबिनेत मंत्री होते तर आई माणिकबाई उसगावकर या शास्त्रीय गायिका होत्या.त्यांची मातृभाषा कोकणी आहे.. पण वर्षा यांना अभिनयात रस होता आणि त्यांनी त्याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.

Varsha Usgaonkar यांचे अभिनयातील करिअर

वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या आहेत. त्यांनी औरंगाबादमध्ये दोन वर्षे लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी ‛गंमत जंमत’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर खट्याळ सासू नाटाळ सून, हमाल दे धमाल,मुंबई ते मॉरिशिअस आणि लपंडाव या सारखे अनेक गाजलेले मराठी चित्रपटात काम केलं. तर दूध का कर्ज, या हिंदी चित्रपटात त्या जॅकी श्रॉफच्या हिरोईन झाल्या. तसेच तिरंगा आणि बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केले आहे. 1990 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या महाभारतात या लोकप्रिय मालिकेत त्यांनी उत्तराची प्रभावी भूमिका केली होती. महापूर या नाटकात त्यांना केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले होते.

Who is Varsh Usgaonkar’s husband?

वर्षा उसगावकर यांनी 2000 मध्ये अजय शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अजय शर्मा देखील चित्रपट सृष्टीत काम करतातं. वर्षा उसगावकर यांनी अजय शर्मा यांच्याशी गोव्यात त्यांच्या बहिणीच्या घरी कुटूंबियांच्या उपस्थित लग्न केलं होतं. त्यांचे सासरे हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर हे होते.

How did Varsha Usgaonkar get the role of Uttara?

आपल्याला उत्तराचा रोल योगायोगाने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्या सेटवर शुटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अभिमन्युसोबत एक सीक्वेन्स सीन सुरू होता. त्यासाठी त्यांच्या पत्नीची भूमिका निभावण्या करिता अभिनेत्रीचा शोध सुरू होता. उत्तराचं कॅरेक्टर निभवायचं होतं. पण अट एक होती. ती म्हणजे अभिनेत्रीला शास्त्रीय नृत्याची जाण असणं महत्त्वाचं होतं. मी जेव्हा सेटवर गेले, तेव्हा प्रोडक्शन डिझायनर गुफी पेंटल यांची नजर माझ्यावर गेली. ते माझ्याकडे आले आणि उत्तराची भूमिका करणार का? असं विचारलं. याची माहिती माझ्या आईवडिलांना मिळाली. तेव्हा त्यांनी होकार दिला. महाभारत या महान सीरिअलचा मी भाग होणार याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना अधिक झाला होता, असं सांगतानाच मला शास्त्रीय नृत्य येत होतं, हा माझा प्लस पॉइंट होता, असंही वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

सासऱ्यांच्या आरोपामुळे अडकल्या होत्या वादाचा भोवऱ्यात

त्यांचे सासरे प्रसिद्ध संगीतकार रवीशंकर यांनी वर्षा उसगावकर आणि त्यांचे पती अजय शर्मा यांच्यावर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. हा मामला इतका बिघडला की त्यांना कोर्टात जावे लागले होते आणि रवीशंकर यांनी त्यांना त्यांच्या संपत्तीमधून बेदखल केले आणि वर्षा आणि अजय यांना स्वतःच्या पार्थिवावर देखिल येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. रवी शंकर यांच्या इच्छेनुसार 2012 मध्ये रवीशंकर यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. वर्षा आणि अजय हे त्यांच्या पार्थिवावर केलेच नाहीत.

सध्या बिग बॉस मराठी 5 मुळे आहेत चर्चेत

सध्या बिग बॉस मराठी 5 मुळे Varsha Usgaonkar पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांचे मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व आहे.त्या स्वतःची आब राखून आणि संयमी खेळत आहेत. त्यांचे बिग बॉसच्या घरात आर्याबरोबर एक वेगळा बॉण्ड पहायला मिळाला.

वर्षा यांनी बिग बॉसमध्ये त्यांच्या आणि अजय यांच्या लग्नापूर्वीचा एक किस्सा सांगितला. त्या सांगत होत्या की त्यांना लव मॅरेज करायचे होते पण त्यांचे अजय शर्माशी अरेंज मॅरेज झाले. जेंव्हा लग्नाच्या आधी त्यांना अजय भेटायला आले तेंव्हा अजय यांचे वजन वाढले असल्याने वर्षा यांना त्यांच्याशी लग्न करू नये असे वाटले.वर्षा यांना वाटले की या माणसाला त्या आधी भेटल्याच नाहीत. त्या अजय यांना म्हणाल्या देखील की तुम्ही खूप बदलले आहात त्यावर अजय म्हणाले की माझे वजन वाढले आहे. पण तू आहे तशीच आहेस.

Varsha Usgaonkar यांना प्रेक्षक पसंत करत आहेत. प्रेक्षकांना वर्षा उसगावकर यांना पहायला आवडत आहे. या आठवड्यात वर्षा उसगावकर कॅप्टन झाल्या आहेत. आता बिग बॉसमध्ये त्या काय काय धमाल करतात ते आपण पुढे पाहणारच आहोतच.

Leave a Reply