सांबरा येथे अपघात
बेळगाव—belgavkar—belgaum :भरधाव मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. सोमवारी सांबरा येथे हा अपघात घडला असून गौसमोद्दीन खादरसाब पिरजादे (उज्ज्वलनगर, बेळगाव) असे त्याचे नाव असून अपघाताची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
बेळगावकडून नेसरगीकडे भरधाव मालवाहू वाहन जात होते
गौसमोद्दीन हा सोमवारी मोटारसायकलवरून पंतबाळेकुंद्री बुद्रुककडून बेळगावकडे येत होता. यावेळी बेळगावकडून नेसरगीकडे भरधाव मालवाहू वाहन जात होते. सांबऱ्यानजीक आल्यानंतर भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गौसमोद्दीन गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने काहीवेळातच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मालवाहू चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन नेमके कोणते होते, हे समजू शकले नाही.
अपघाताची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवचिकित्सा शवागारात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
died in an accident in Sambra Belgaum
died in an accident in Sambra Belgaum
died in an accident in Sambra Belgaum