हैदराबाद येथील 14 भाविक घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन शिर्डीकडे परतत असताना बुधवारी रात्री गंगापूर-वैजापूर महामार्गावर त्यांच्या जीपचा accident झाला. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जीपची जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेत चार भाविकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी (48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने) आणि अक्षिता श्यामशेट्टी (20) यांचा समावेश आहे.
अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं. जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून, गंभीर जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे भाविकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
परतीचा प्रवास accident
हैदराबाद येथील 14 भाविक शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट दिली. घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन शिर्डीकडे परतत असताना गंगापूर-वैजापूर महामार्गावर त्यांच्या जीपने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जीपने समोरच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. यामुळे जीपमधील काही जण गंभीररीत्या जखमी झाले, तर काहींना जागीच प्राण गमवावे लागले. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले.
also read – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर: 8th Pay Commission India 2025
पोलिसांनी दाखवली तत्परता
accident नंतर काही वेळातच गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचारी रिजवान शेख आणि प्रविण प्रधान यांनी पोलिसांची जीप वापरून जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवलं. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं.
पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे अनेक जखमींच्या जीविताचे रक्षण होऊ शकले. तरीही चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ही दुर्घटना भाविकांच्या कुटुंबासाठी मोठं संकट ठरली आहे.
मृतांच्या दागिन्यांवर चोरीचा आरोप
या accident नंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मृतांच्या अंगावरील चार तोळे सोनं आणि 13 हजार रुपये रोख चोरीला गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अपघातानंतर जमलेल्या काही लोकांनी ही चोरी केल्याचा संशय आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरीला गेलेल्या दागिन्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
भाविकांच्या मृत्यूने व्यक्त झाली हळहळ
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी, वेरुळ आणि घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येतात. परंतु, दर्शनानंतरच्या परतीच्या प्रवासात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय हैदराबाद येथील असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या तपासानंतर या दुर्घटनेतील अधिक तपशील समोर येईल. मात्र, हा अपघात सर्वांसाठी एक धडा ठरला असून रस्ते सुरक्षेचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे.