बेळगावच्या दिशेने जाणारी दुचाकी घसरुन अपघात
बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : करंबळ (ता. खानापूर) येथून बेळगावच्या दिशेने जाणारी दुचाकी घसरुन दोघे तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी बेळगावच्या खासगी इस्पितळात मृत्यू झाला. विक्रम मारुती पाटील (वय 33, रा. बहाद्दरवाडी ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.
दुचाकीवरून काही कामानिमित्त खानापूरला आले होते
दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र अतुल पाटील हा जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी ते दोघेही दुचाकीवरून काही कामानिमित्त खानापूरला आले होते. पाचच्या सुमारास परत जाताना हत्तरगुंजी क्रॉसजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले.
विक्रमच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. जखमींना बेळगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, सोमवारी पहाटे सहा वाजता विक्रम याचा मृत्यू झाला. तो नावगे येथील कारखान्यात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
Death in accident near Hattargunji Cross Belgaum Khanapur
Death in accident near Hattargunji Cross Belgaum Khanapur