बेळगाव : जिवंत असलेल्या नातवाचे मृत्यू प्रमाणपत्र @सावगांव

Belgaum Belgavkar
2 Min Read

अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

 

बेळगाव—belgavkar—belgaum : आजोबांचे निधन झाल्यानंतर न्यायालयात खटला दाखल करुन निधन झाल्याबाबतच्या आदेशाची प्रत मिळविली. ती प्रत तहसीलदार आणि तलाठ्यांना दिली. मात्र, निधनाची नोंद करताना आजोबांऐवजी जीवित असलेल्या अर्जदार नातवाचेच निधन झाल्याची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधितांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना भेटून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वर्षभरापासून सरकारी योजनांपासून वंचित

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सावगांवमधील मष्णू शट्टू काकतकर यांचा 1976 मध्ये मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची नोंद कागदोपत्री झाली नाही. त्यामुळे, त्यांचे नातू गणपती खाचू काकतकर यांच्यासह अन्य नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेऊन याबाबतची नोेंद न्यायालयाव्दारे करवून घेतली. जेएमएफसी चतुर्थ न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करुन मृत्यू झाल्याची नोंद करुन त्या आदेशाची प्रतही दिली. न्यायालयाचे आदेश प्रत तहसीलदार व तलाठ्यांना देऊन त्यांचे नाव कमी करावे असा अर्ज गणपती काकतकर यांनी दिला.

 

- Advertisement -

मात्र, संबंधित अधिकार्‍यांनी अर्ज केलेल्या व्यक्तीचाच मृत्यू झाल्याची नोंद केली. परिणामी गणपती काकतकर गेल्या वर्षभरापासून सरकारी योजनांपासून वंचित राहिले आहेत. त्यांची वृध्दाप पेन्शनही बंद झाली आहे. याबाबत त्यांनी हिंडलगा येथील तलाठी मंजुनाथ तिपोजी यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी आश्वासनाव्यतिरीक्त काहीच केले नाही. अधिकार्‍यांनी केलेल्या चुकीचा फटका बसला आहे. संबधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Death certificate living grandson Belgaum Savgav
Death certificate living grandson Belgaum Savgav

Death certificate living grandson Belgaum Savgav

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *