Dattatraya Temple Gangnapur
कर्नाटक—belgavkar : कोणी आरोग्य लाभावे तर कोणी परीक्षेत, नोकरीत, उद्योगात, व्यवसायात यश मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून देवस्थानातील हुंडीला देणगी देत असतात. एका महिलेने चक्क ‘आपल्या सासूला लवकर मरण यावे’ अशी देवाकडे प्रार्थना करून हुंडीमध्ये (देणगी पेटी) 50 रुपयांची नोट सोडली आहे. या प्रकाराची देवस्थान परिसरात चर्चा सुरू आहे.
गाणगापूर (जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थान प्रसिद्ध असून याठिकाणी दर्शनासाठी भाविकांचा नेहमीच ओघ असतो. काही दिवसापूर्वी हुंडीतील देणगीची मोजदाद सुरू असताना त्यामध्ये मिळालेल्या 50 रुपयाच्या नोटेवर कन्नडमधून मजकूर होता. ‘नन्न अत्ते बेग सायली स्वामी’ (माझ्या सासूला लवकर मरण येवो) असा मजकूर देणगीची मोजदाद करणाऱ्या सर्व भक्तांना थक्क करून सोडला.
असाच एक प्रकार फत्तरगा (जि. गुलबर्गा) येथील भाग्यवंती मंदिरात दिसून आला. हुंडीमध्ये 20 रुपयाच्या नोटेवर वरील प्रमाणेच मजकूर होता. दत्तात्रेय व भाग्यवंती या मंदिरांना 60 लाख 5814 रुपये रोकड, एक किलो चांदीचे दागिने, 200 ग्रॅमचे सोन्याचे आभूषण देणगीदाखल मिळाले आहे. मात्र 50 व 20 रुपयांच्या नोटेवरील मजकुर हा खटकणारा असला तरी चर्चेचा ठरला आहे.
Dattatraya Temple Gangnapur
Dattatraya Temple Gangnapur