पेपरला विद्यार्थी आईचं नाव विसरला अन् थेट तुरुंगात, प्रकरण काय?

Belgaum Belgavkar
3 Min Read

एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मध्यप्रदेशातील दमोहमध्ये एलएलबीची परीक्षा देण्यासाठी एक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचला होता, मात्र एका चुकीमुळे तो पकडला गेला. हा तरुण आपल्या मित्राची परीक्षा देण्यासाठी आला होता. बनावट विद्यार्थ्याने पेपरमध्ये सर्वकाही बरोबर भरले. परंतु खऱ्या विद्यार्थ्याच्या आईचे नाव विसरला.

कॉलेजमध्ये एलएलबी परीक्षा

अशा अवस्थेत कॉलेजच्या प्राध्यापकाने त्याला धारेवर धरले. यानंतर पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. दमोह येथील पीएम श्री पीजी कॉलेजमध्ये एलएलबी म्हणजेच कायद्याचे पेपर सुरू आहेत. गुरुवारी कॉलेजमध्ये तिसऱ्या सेमिस्टरची इंग्रजीची परीक्षा होती. एका तरुणाच्या जागी त्याचा मित्र परीक्षेला बसण्यासाठी कॉलेजमध्ये आला होता.

आईचे नाव सांगता येत नव्हते

बनावट उमेदवाराची एकच चूक होती की, ज्या व्यक्तीसाठी तो परीक्षा देत होता त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव त्याला आठवत होते, परंतु आईचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे तो अडकला होता. माहितीनुसार, बनावट उमेदवार आरामात बसून परीक्षा देत होता. या वेळी पथक तपासणीसाठी परीक्षागृहात आले असता सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचे फोटो जुळत होते. अशा स्थितीत संघातील एका महिला प्राध्यापकाला बनावट उमेदवाराचा संशय आला.

 

- Advertisement -

Admit कार्डच्या फोटोवरुन त्याचा चेहरा दिसत असला तरीही प्राध्यापकाचा संशय कमी झाला नाही. संशयामुळे महिला प्राध्यापिकेने परीक्षार्थीना वडिलांचे नाव विचारले असता त्यांनी ते बरोबर सांगितले. मात्र आईचे नाव विचारताच तो सांगू शकला नाही. अशा स्थितीत या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली असता हा विद्यार्थी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

मागील पेपरमध्ये खरा विद्यार्थी आला होता की

तपासादरम्यान असे आढळून आले की, परीक्षा हॉलमध्ये विपुल सिंघाई नावाच्या विद्यार्थ्याच्या जागी हिमांशू नेमा नावाचा तरुण परीक्षा देत होता. यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून विद्यार्थ्याला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पेपरमध्ये खरा विद्यार्थी आला होता की हा बनावट विद्यार्थी परीक्षा देत होता. याचाही शोध महाविद्यालय व्यवस्थापन घेत आहे.

 

1. #Damoh
2. #FakeStudent
3. #LLBExam
4. #ExamCheating
5. #StudentArrested
6. #CollegeScandal
7. #EducationFraud
8. #MotherName
9. #ExamHall
10. #LegalEducation
11. #MadhyaPradesh
12. #StudentLife
13. #AcademicIntegrity
14. #ExamCrisis
15. #PoliceAction
16. #HigherEducation
17. #CollegeLife
18. #ExamMistake
19. #FraudulentCandidate
20. #StudentMisconduct

damoh fake student arrested llb exam mother name
damoh fake student arrested llb exam mother name
damoh fake student arrested llb exam mother name

damoh fake student arrested llb exam mother name

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *