Shreyas talapade & Alok nath यांच्यावर स्कॅमप्रकरणी तक्रार दाखल

Admin
3 Min Read
Shreyas talapade & Alok nath

Shreyas Talapade & Alok Nath यांच्याविरुद्ध मल्टी लेव्हल मार्केटिंग (MLM) स्कॅमप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या एका कंपनीने लाखो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. हरियाणातील सोनीपत येथे या प्रकरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कंपनीसाठी Shreyas talapade & Alok nath यांनी जाहिरात केली होती, त्यामुळे त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.

कंपनी करत होती  ६ वर्षांपासून फसवणूक

तक्रारीनुसार, कंपनीने गेल्या ६ वर्षांत लोकांकडून फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा अन्य गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे गोळा केले. मोठ्या परताव्याचे आश्वासन देत, महागड्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले जात होते आणि बहु-स्तरीय मार्केटिंगच्या माध्यमातून एजंट तयार केले जात होते. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे दिले गेले, पण नंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. लोकांनी पैसे परत मागितल्यावर, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद करून सर्व संपर्क तोडला.


also read – स्त्री-2 चित्रपटाला मागे टाकले #Pushpa2


२०२३ मध्ये झाली फसवणूक उघड

२०२३ मध्ये कंपनीने आपली फसवणूक केली असे लोकांच्या लक्षात आले. मोठ्या दाव्यांमागे खरा हेतू लपवून अनेक वर्षे लोकांना गंडवले. शेवटी, गुंतवणूकदारांनी आरोप करायला सुरुवात केली तेव्हा कंपनीचे मालक, एजंट्स आणि अधिकारी पळून गेले. कंपनीच्या कार्यालयांवर कुलूप लावण्यात आले, आणि ग्राहकांच्या पैशांसह सर्वजण बेपत्ता झाले. 

- Advertisement -

एफआयआरमध्ये Shreyas talapade & Alok nath नावे

या स्कॅममध्ये Shreyas talapade & Alok nath यांच्यासह एकूण ११ जणांची नावे एफआयआरमध्ये नमूद आहेत. कंपनीच्या २५० पेक्षा अधिक सुविधा केंद्रांवर एजंट्सद्वारे काम चालत होते, तर वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

एजंट्सना ट्रॉफी देऊन प्रोत्साहन

या मार्केटिंग योजनेत, ज्या एजंटने जास्त लोकांना जोडले, त्याला प्रोत्साहन म्हणून ट्रॉफी दिली जात असे. या योजनेच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला नेमण्यात आले होते. यामुळेच या फसवणुकीत त्याचेही नाव समोर आले आहे.

काही गुंतवणूकदारांनी या प्रकरणाबाबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने २५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीत सोसायटीच्या अधिकाऱ्यांना लोकांचे पैसे कसे परत करायचे, यावर उत्तर द्यावे लागणार आहे.

या घटनेमुळे अनेक गुंतवणूकदार फसवले गेले आहेत आणि त्यांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

या प्रकरणाने समाजामध्ये मोठी खळबळ उडवली असून अनेक जणांना मोठ्या आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागला आहे.

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *