Samsung Galaxy M55s 5G:- भारतात Samsung ने त्यांचा Galaxy M55s 5G मोबाईल लाँच केला आहे. यात अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून यात एकाच वेळी फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याने एकत्र व्हिडिओ शूट करता येईल अशी सोय देण्यात आली आहे.
Samsung Galaxy M55s 5G या मोबाईल मध्ये फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यात एकाचवेळी व्हिडिओ शूट करता येते हीच बाब याचे खास वैशिष्टय आहे. या मोबाईल मध्ये 50 MP चा triple Rear Camera सेटअप मिळत आहेच सोबत 128 GB चे इंटर्नल storage मिळत आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5000 mAh ची बॅटरी आहे. चला तर मग जाणून घेऊया या खास आणि दमदार मोबाईलची संपूर्ण माहिती, फीचर्स आणि किंमत.
Specifications of Samsung Galaxy M55s 5G
या मोबाईलमध्ये 6.67 इंचाचा Full HD display+ sAMOLED Display आहे. याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. यात पंच होल कटआऊट मिळतेच सोबत याचा पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे. हा मोबाईल Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच, फास्ट प्रोसेसिंगसाठी या डिव्हाइसमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जर आपण याच्या RAM बद्दल बोललो तर यात 8 GB ची RAM देण्यात आली आहे.
यात triple Rear कॅमेरा सेटअप असून याचा प्रायमरी सेन्सर 50 MP चा आहे. तसेच हा मोबाईल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतो. या मोबाईल कॅमेरा सेटअप मध्ये 8 MP चा अल्ट्रा वाइड आणि 2 MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. यात ड्युअल रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध असल्यानेच एकाचवेळी फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ शूटिंग करता येते.
या मोबाईलच्या कॅमेराचे खास स्पेक्स म्हणजेच यात नाइट फोटोग्राफी आणि नो-शेक कॅम मोड आहेत. जर आपण Samsung Galaxy M55s 5G च्या फ्रंट कॅमेऱ्या बद्दल बोलायचे झाल्यास हा कॅमेरा 32 MP चा देण्यात आला आहे. यामुळे या मोबाईल मध्ये काढलेले सेल्फी एकदम शानदार येणार आहेत.
मूळचा कोरियन ब्रँड असलेल्या Samsung ने त्यांच्या या नव्या मोबाईलमध्ये 45 W ची फास्ट चार्जिंग असलेली 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. यामुळे वापरकर्त्याला सतत बॅटरी डाऊनचे प्रॉब्लेम येणार नाहीत.
हे सर्व फीचर्स सोडले तर यात अजून फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉकसह वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाईप- सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
हा Samsung चा Galaxy M55s 5G मोबाईल थंडर ब्लॅक आणि कोरल ग्रीन अश्या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. तसेच या हँडसेटची जाडी 7.8 मिमी आहे.
Samsung Galaxy M55s 5G Price
आता इतके छान फीचर्स पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मोबाईलची किंमत आहे तरी किती! तर हा मोबाईल अगदी सामान्य माणसांना परवडेल अश्या फक्त आणि फक्त 19999/- रुपयांत उपलब्ध आहे.
19999/- या प्रारंभिक किमतीत हा मोबाईल कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे आणि यावर 2000/- रुपयांचा डिस्काउंट देखील दिला आहे. म्हणजेच डिस्काउंट मिळवून तुम्ही हा मोबाईल फक्त आणि फक्त 17999/- रुपयांत विकत घेऊ शकता. या मोबाईलची Amazon वर 26 सप्टेंबर पासून विक्री सुरू होणार आहे. तसेच याच दिवसापासून Samsung Exclusive Stores आणि Samsung.in वर देखील याची विक्री सुरू होईल.
या मोबाईलच्या 8GB + 128GB पर्यायासाठी 19999/- तर 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी रु. 22999/- अशी किंमत आहे.
Features chart of Samsung Galaxy M55s 5G
Display | 6.67 inches |
Front Camera | 32 Megapixels |
Back Camera | 50 Megapixels |
RAM | 8 GB |
Storage | 128 GB and 256 GB |
Battery | 5000mAh |
OS | Android 14 |
जर सणांच्या काळात आणि भरघोस डिस्काउंट सोबत मस्त दमदार फीचर्स असलेला आणि तरीही कमी किमतीचा मोबाईल जर तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही Samsung Galaxy M55s 5G या लेटेस्ट स्मार्ट फोनचा विचार नक्कीच करू शकता.
FAQ
१. How many 5G bands are in the Samsung M55 5G?
:- 1, 3, 5, 7, 8, 20, 28, 38, 40, 41, 66, 77, 78 SA/NSA/Sub6
२. How old is the Samsung M55?
:- 28th March 2024
३. Is the M55 Samsung waterproof?
:- No. The Samsung Galaxy M55 5G is not water-resistant.
४. What is the price of Samsung Galaxy M55s 5G?
:- For 8GB + 128GB Variant price is 19999/- and for 8GB + 256GB variant 22999/-
1 thought on “सॅमसंग चा Monster भारतात लॉंच : Samsung Galaxy M55s 5G”