Cold wave grips Karnataka, Vijayapura shivers at 9 degrees Celsius
Weather update : Coldwave conditions intensify in Karnataka
कर्नाटक—belgavkar : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) कर्नाटकच्या बहुतांश भागांमध्ये, विशेषतः उत्तर आंतरिक कर्नाटकासाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. बिदर, गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेसाठी यलो अलर्ट दिला आहे.
India Meteorological Department (IMD) has predicted low temperatures
विजापूरमध्ये 9, हसनमध्ये 10.3 आणि चिंतामणीमध्ये 10.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस कर्नाटकातील बहुतांश भागात किमान तापमानात घट होईल. हे डोंगराळ भागातून वाहणाऱ्या उत्तरेकडील वाऱ्यांमुळे आहे.
किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आयएमडी (बंगळूर) प्रभारी संचालक एन. पुविरासन यांनी सांगितले. वाऱ्याचा पॅटर्न पुन्हा बदलेल आणि पूर्वेकडील वारे वाहू लागतील ज्यामुळे किमान तापमान वाढू लागेल आणि कमाल तापमानात घट होईल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.