#कुरापत लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न

Belgaum Belgavkar
2 Min Read

China includes Ladakh area in 2 new counties

India protests Chinas 2 new counties which ‘fall in Ladakh region’

चीनमध्ये असलेल्या होटन प्रीफेक्चर प्रदेशात 2 नव्या काऊंटींची घोषणा केली असून, त्यातील काही भाग हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील आहे. त्यामुळे चीनच्या या कृतीचा भारताने कठोर शब्दांत विरोध केला आहे. चीनने केलेल्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे.

announcement of two new counties in China’s Hotan Prefecture, which are parts of Ladakh

होटन प्रीफेक्चर भागामध्ये हियान आणि हेकांग या दोन नव्या काऊंटीत भारताचा अविभाज्य भाग असलेल्या लडाखच्या काही प्रदेशाचा समावेश करण्याच्या चीनच्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे भारताने म्हटले आहे (He’an County and Hekang County).

पूर्व लडाखमधील सीमातंट्यावर दोन्ही देशांनी एका कराराद्वारे तोडगा काढला असताना आता पुन्हा लडाखमधील भूभागावर डोळा ठेवून चीनने नव्याने कुरापत काढली आहे. त्यामुळे भारत व चीनमधील संबंध सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असे वाटत असतानाच हे नवे प्रकरण उद्भवले आहे.

 

- Advertisement -

.
पूर्व लडाखमध्ये डेमचोक, डेपसांग येथे सीमेवरून दोन्ही देशांनी आपापले सैन्य २१ ऑक्टोबर रोजी मागे घेतले. २३ ऑक्टोबरला सीमातंट्यावरील तोडग्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ब्रिक्स परिषदेदरम्यान चर्चा झाली. कैलास मानससरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, नद्यांसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण तसेच दोन्ही देशांतील व्यापार वाढविणे या विषयांवर दोन्ही नेत्यांनी बोलणी केली हाेती.
China includes Ladakh area in 2 new counties
China includes Ladakh area in 2 new counties

China includes Ladakh area in 2 new counties

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *