सातारा (SATARA) जिल्ह्यामधे सर्वात अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील कांदाटी खोरे मधील हे गाव आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे GST मुख्य आयुक्त श्री. चंद्रकांत वळवी ( CHANDRAKAT VALVI ) यांनी या गावची सुमारे ६२० एकर जमीन विकत घेतली आहे असे समोर आले आहे. त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करुण करवाई करावी अन्यथा १० जून पासून सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण ला बसणार असल्याचा इशारा सातारा मधील प्रसिद्द सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे (SUSHANT MORE)यांनी दिला आहे.
कशी बळकावली ६२० एकर जमीन
चंद्रकांत वळवी (CHANDRAKAT VALVI) हे गुजरात मधील अहमदाबाद येथील जी एस टी कार्यालयात मुख्य आयुक्त आहेत. चंद्रकांत वळवी हे स्वतः तसेच त्यांचे कुटुंब, नातेवाईक मधील एकून १३ जणांनी महाबलेश्वर तालुक्यातील झाडानी ह्या गावातील ६२० एकर जमीन विकत घेउन ताबा घेतला आहे. तसेच ही जमीन घेताना त्यांनी पर्यावरण अधिनियम कायदा, वन अधिनियम कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा सर्वांचे उल्लंघन केले आहे असे समोर आले आहे.
गुजरातमधील एका मोठ्या नेत्याचा आशीर्वाद
आता मोठी व्यक्ति पाठीशी असल्याशिवाय हे शक्य नाही. चंद्रकांत वळवी (CHANDRAKAT VALVI) या भूखंड माफिया ला पण गुजरातमधील एका मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे. त्यांच्या मदतिनेच महाबलेश्वर (MAHABALESHWAR) तालुक्यातील झाडानी हा भूखंड विकत घेउन येथे अनाधिकृत रित्या रिसोर्ट चे बांधकाम चालू आहे. तसेच रेनुसे ते झाडानी वरुण उचाट ते रघुवीर घाट हां मोठा दोन पदरी रस्ता चे काम ही चालू आहे तसेच रस्त्यासाठी लागणारे डाम्बर लागते हां ही प्लांट रेनुसे गावत अनाधिकृत पाने चालू आहे.
यांच्या मुळ आले समोर
सध्या महाराष्ट्र भर सह्याद्री वाचवा (SAVE SAHYADRI ) मोहिम चालु आहे. महाराष्ट्र मधील सह्याद्री रांगेतिल जैवविविधता आणि निसर्गसंपदा जपने हे मुख्य उदिष्ट ‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेचे आहे. याच मोहिमे अंतर्गत माहितीच्या अधिकारातुन चंद्रकांत वळवी (CHANDRAKAT VALVI) यांनी सातारा (SATARA) मधील ६२० एकर जमीन म्हणजेच पूर्ण एक गावच विकत घेतल्याचे समोर आले आहे.