सावधान Nipah virus मुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू ! पुन्हा एकदा .. ..

Pratiksha Majgaonkar
5 Min Read
nipah virus

कोरोना आणि मंकी पॉक्स मधून जरा सुटका होत नाही तोवर आता निपाह व्हायरस (Nipah Virus) ने डोके वर काढले आहे. केरळच्या मलप्पुरम मध्ये २४ वर्षीय विद्यार्थ्याचा nipah virus मुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ही या वर्षातील दुसरी घटना आहे.

येथील nipah virus मुळे मृत्यू झाल्याची पुष्टी समोर येताच तेथील प्रशासनाने contentment zone मधील शाळा, कॉलेज, सिनेमा गृह पुढील आदेशापर्यंत बंद राहतील असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात इतर निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. बाहेर पडताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे असेही सांगितले आहे. तिरुवली ग्रामपंचायतीचे प्रभाग 4, 5, 6 आणि 7 आणि ममपाड ग्रामपंचायतीचे प्रभाग 7 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

या वॉर्डातील लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्य न करण्याचा सल्ला दिला आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या झोन मधील दुकाने आणि ऑफिसांना सकाळी १० ते ७ काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या अंत्य संस्कारात सहभागी झालेल्या १५ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जे १५१ जण डायरेक्ट संपर्कात आले होते त्यांना देखील Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

Nipah Virus बद्दल सविस्तर माहिती

Nipah हा एक प्रकारचा प्राण्यांमधून माणसात पसरणारा धोकादायक विषाणू आहे. म्हणूनच या व्हायरसला झुनोटिक व्हायरस देखील म्हणले जाते. हा व्हायरस प्रामुख्याने वटवाघूळा मुळे पसरतो त्यामुळे याला फ्लाईंग फॉक्स म्हणले जाते. डुक्कर, बकरी, घोडा, कुत्रा किंवा मांजर यांसारख्या इतर प्राण्यांमधून देखील हा पसरू शकतो. हा व्हायरस शक्यतो बाधित प्राण्याच्या विष्ठा, लाळ, रक्त किंवा मूत्र यातून पसरतो.

Nipah Virus आढळणारी ठिकाणे

हा व्हायरस शक्यतो दरवर्षी डोके वर काढतो. आशिया खंडातील बांगलादेश आणि भारतात nipah virus आढळतो. सर्वात पहिल्यांदा या व्हायरसचा शोध १९९९ मध्ये लागला होता.

त्यावेळी मलेशिया आणि सिंगापूर मध्ये या व्हायरस मुळे तब्बल १०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

भारता व्यतिरिक्त हा व्हायरस बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये आढळतो.

Nipah Virus पसरण्याची कारणे

  1. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हा आजार प्राण्यांमुळे माणसाला होतो. यात वटवाघूळाचे प्रमाण अधिक आहे.
  2. हा विषाणू डुक्कर किंवा वटवाघूळामुळे पसरतो.
  3. पुढे एका संक्रमित माणसाकडून निरोगी माणसाला होऊ शकतो.
  4. फळे खाणारी वटवाघळे म्हणजेच फ्रूट बॅट ही nipah virus ची नैसर्गिक वाहक आहेत.

Virus ची लक्षणे (Symptoms of Nipah Virus)

जेव्हा एखादी व्यक्ती nipah virus च्या संपर्कात येते तेव्हा साधारण ४ ते १४ दिवसांच्या कालावधीत लक्षणे दिसून यायला सुरुवात होते. सुरुवात अगदी साध्या ताप किंवा डोकेदुखीने होते. त्यांनतर खोकला होतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो अश्या काही समस्या निर्माण होऊ लागतात.

Nipah Virus ची लागण झाल्यावर खालील प्राथमिक लक्षणे असू शकतात

  1. ताप
  2. डोकेदुखी
  3. श्वास घेण्यास अडचण येणे
  4. खोकला
  5. घसा खवखवणे
  6. उलट्या
  7. अतिसार
  8. स्नायूंमध्ये वेदना होणे
  9. अशक्तपणा जाणवणे

जर Nipah virus ची गंभीर लक्षणे असतील तर मेंदूला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. यात जीवाला जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

अश्या गंभीर प्रकरणांमध्ये खालील लक्षणे आढळून येतात

  1. बोलण्यास अडचण येणे
  2. बेशुद्ध होणे
  3. झटके येणे
  4. श्वसनाच्या समस्या निर्माण होणे
  5. संभ्रम होणे.

Virus वरील उपाय

WHO (World Health Organization) च्या सांगण्यानुसार यावर अद्याप कोणतेही औषधोपचार किंवा लस उपलब्ध नसल्याने फक्त हा विषाणू पसरू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो.

Nipah Virus ची लागण होऊ नये म्हणून करायचे प्रतिबंधात्मक उपाय

  1. झाडाखाली पडलेली उष्टी फळे खाऊ नयेत.
  2. आजारी डुकरांचा आणि वटवाघळांचा संपर्क टाळा
  3. साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा
  4. दूषित होऊ शकणारे पदार्थ खाणे आणि पेये पिणे टाळा
  5. संक्रमित व्यक्तींशी थेट संपर्क टाळा
  6. संक्रमित व्यक्तीचे रक्त आणि शरीरातील द्रवपदार्थांशी कोणताही संपर्क टाळावा
  7. जर काही लक्षणे आढळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Nipah Virus पसरू नये म्हणून घ्यायची काळजी

  1. Virus बद्दल जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाय सर्वांना सांगावेत.
  2. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून मगच त्याचे सेवन करावे.
  3. आजारी प्राण्यांची देखभाल करताना संरक्षक कपडे आणि ग्लोव्हज परिधान करावेत.
  4. ताज्या अन्न पदार्थ आणि खजूर रसाच्या उत्पादन क्षेत्रात वटवाघळांचे प्रमाण कमी करावे.

FAQ

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *