आत्महत्येप्रकरणी 6 जणांवर गुन्हा
बेळगाव—belgavkar—belgaum : सांबरा येथे विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेची आई भारता गावडू मोरे (रा. राकसकोप) यांनी तशी फिर्याद दिली असून पोलिसात पती, सासू-सासऱ्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सांबरा येथील सविता मारुती जोगानी (वय 32) या विवाहितेने 28 डिसेंबर 2024 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी मृताच्या आईने आपल्या मुलीचा घातपात झाला असल्याची फिर्याद मारिहाळ पोलिसात दिली होती. परंतु, पोलिसांनी तेव्हा संशयास्पद मृत्यू इतकीच नोंद करून घेतली होती.
या घटनेचा तपास करुन मारिहाळ पोलिसांनी गुरुवारी पती, सासू, सासऱ्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मारुती फकीरा जोगानी, फकीरा जोगानी, शांताबाई फकीरा जोगानी, केदारी जोगानी, स्मिता जोगानी (सर्वजण रा. सांबरा) व मल्लवा शिंदोळकर (रा. निलजी) यांचा समावेश आहे. मारिहाळ पोलिस पुढील तपास करत आहेत.
case of suicide married woman in Sambara FIR Belgaum
case of suicide married woman in Sambara FIR Belgaum