Man dies as car falls into Ghataprabha River in Belgaum
पुणे-बंगळूर महामार्गावरील बेनकोळी गाव
बेळगाव—belgavkar—belgaum : यमकनमर्डी : नियंत्रण सुटल्याने कार घटप्रभा नदीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळूर महामार्गावरील बेनकोळी गावाजवळ घडली. किरण लक्ष्मण नावलगी (वय 45) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किरण हे दड्डी (ता. हुक्केरी) येथील रहिवासी होते.
घटप्रभा नदी काठावरील या बेनकोळी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघात उघडकीस आला आहे. त्यामुळे दड्डी गावात तसेच बेनकोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मासेमारीसाठी गेलेल्या बाप व दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटनाही दीड महिन्यापूर्वी घटप्रभा नदी काठावरील या बेनकोळी गावातच घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे बेनकोळी गावात पुन्हा चर्चेत आले आहे. याप्रकरणी मृत किरण यांच्या पत्नी सुखदेवी यांनी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किरण हे 30 डिसेंबर रोजी सकाळी आपली कार घेऊन घराबाहेर पडले होते. 30 व 31 रोजी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. बुधवारी सकाळी घटप्रभा नदीत मोटार कोसळल्याची माहिती यमकनमर्डी पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोटार बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. अथक प्रयत्नानंतर मोटार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. ती मोटार किरण यांची असल्याचे निष्पण्ण झाले. मोटारीमध्येच किरण नावलगी यांचा मृतदेह आढळून आला.
राष्ट्रीय महामार्गालगतच ही घटना घडल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दीही झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर दड्डी ग्रामस्थही मोठ्या संख्येने बेनकोळी येथे जमा झाले होते. बुधवारी सकाळीच मोटार व मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. यमकनमर्डी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी किरण यांचे कुटुंबीय व दड्डी ग्रामस्थांची मदत घेतली. नावलगी यांचा दड्डी गावात स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे दड्डी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
car falls into Ghataprabha River in Belgaum
car falls into Ghataprabha River in Belgaum