Starlink ने एक मोठी क्रांती घडवली आहे! आता स्मार्टफोनच्या मदतीने थेट सॅटेलाईटद्वारे कॉलिंग आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी पारंपरिक mobile towers ची गरज भासणार नाही.
नेटवर्क नसलेल्या भागांसाठी वरदान
Starlink च्या या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही, तिथेही कनेक्टिव्हिटी कायम राहणार आहे. जसे की दुर्गम भाग, डोंगराळ प्रदेश किंवा जंगल क्षेत्र. आता तिथेही अखंडित संपर्क साधता येणार आहे.
थेट सॅटेलाईट कनेक्शन
या नव्या technology च्या मदतीने कॉलिंग, texting आणि इंटरनेटचा वापर कोणत्याही विशेष hardware किंवा apps शिवाय करता येणार आहे. सध्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये ही सेवा सुरू आहे.
हे हि वाचायला हवे – तुम्हाला घ्यायचा आहे का Bsnl VIP मोबाईल नंबर? पहा कशी आहे पूर्ण प्रोसेस
जलद इंटरनेटचा अनुभव
ट्विकटाऊनच्या अहवालानुसार, काही ठिकाणी 250-350 एमबीपीएसचा internet speed मिळत आहे, जो पारंपरिक फायबर सेवांपेक्षा खूप वेगवान आहे.
भविष्यातील दृष्टीकोन
2025 पर्यंत ही सेवा अधिक व्यापकपणे उपलब्ध होईल आणि जागतिक कनेक्टिव्हिटीचा दर्जा सुधारेल. Starlink च्या या Direct to Cell सेवेमुळे मोबाईल communication चा चेहरामोहराच बदलणार आहे.
Starlink च्या या नव्या प्रयोगामुळे जागतिक संवादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे!