बेळगाव : खानापूर बंदची हाक

Belgaum Belgavkar
4 Min Read

BJP, JDS and Other Organizations Call For Khanapur Bandh

 

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर vs आमदार सीटी रवी प्रकरण

Derogatory remarks case : Minister Laxmi Hebbalkar vs MLC CT Ravi

Call For Khanapur Bandh

बेळगाव—belgavkar—belgaum : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी. टी. रवी यांच्यातील वाद प्रकरण खानापूर पोलिस विभागासाठी डोकेदुखी ठरले आहे. एकीकडे खानापूर सीपीआय मंजुनाथ नायक यांना निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे त्यांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी खानापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

उत्तर विभागाचे आयजीपी विकास कुमार यांनी आमदार रवीच्या अटकेप्रकरणी कारवाई केली आहे. अटकेनंतर खानापूर पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांनी विरोध केला होता, यावेळी अटकेबाबत पोलीस ठाण्यातचं चर्चा झाली. खानापूर पोलीस ठाण्याचे CPI मंजुनाथ नायक यांना निलंबित करण्याचा आदेश जारी झाला आहे. खानापूरच्या सीपीआयवर कारवाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी उद्या (गुरुवारी) खानापूर येथे येण्याचे आवाहन केले आहे.

सीटी रवीला हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यातून १९ डिसेंबर रोजी खानापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. स्थानकातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन पुरेशी सुरक्षा देण्याची सूचना करण्यात आली. आरोपी (सीटी रवी) वगळता कोणालाही आत येण्याचे आदेश दिले नाहीत.

- Advertisement -

सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या निलंबनाचा निषेध केला असून भाजप, जेडीएस, दलित समर्थक आणि कन्नड समर्थक संघटनांनी निलंबन मागे घेण्याची मागणी करत खानापूर शहरात बंदची हाक दिली आहे.

BJP leader CT Ravi gets interim bail

No proof of BJP MLC CT Ravi abusing Laxmi Hebbalkar: Karnataka council chief Basavaraj Horatti

सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी म्हणाले, विधान परिषदेतील वादाचे प्रकरण आता संपुष्टात आले आहे.

Karnataka Minister Hebbalkar releases video of objectionable comments, says will continue legal battle against BJP MLC Ravi

आमदार रवी यांनी अधिवेशनादरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी कथित अपशब्द वापरल्याच्या प्रकरणावर मंत्री हेब्बाळकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी सभागृहातील ‘त्या’ गदारोळाची ऑडिओ क्लिपही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे दाखविली आहे. मंत्री हेब्बाळकर यांनी आक्षेपार्ह टिप्पण्यांचा व्हिडिओ जारी केला, भाजप आमदार रवी विरुद्ध कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचीही माहिती दिलीयं

19 डिसेंबर रोजी बेळगावातील सुवर्णसौधमधील विधान परिषदेच्या सभागृहात रुलिंग दिले होते. त्यानंतर कामकाज बेमुदत तहकूब करण्यात आले. सभागृहात घडलेल्या कोणत्याही वादामध्ये किंवा इतर प्रकरणांमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करता येत नाही. कामकाज बेमुदत तहकूब केल्याने सभागृहाचा दरवाजा बंद केला आहे. त्यामुळे पोलिसांना सभागृहाबाहेर घडलेल्या घडामोडीविषयी तक्रार केली तर त्यामध्ये आपण कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पण, सभागृहातील घडामोडींमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याची परवानगी नाही. सदर घटना घडल्यानंतर पहाटे 1 पर्यंत आ. सी. टी. रवी यांच्या संपर्कात होतो.

शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

अधिवेशन काळात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर आमदार रवी यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप झाल्याने गोंधळ उडाला. यानंतर दुपारी ४.१५ च्या सुमारास आमदार रवी व किशोर. बी. आर. हे दोघेजण विधानसभा सभागृहातून विधान परिषदेकडे निघाले होते. यावेळी अधिवेशन पाहण्यासाठी गेलेल्या टोळक्याने दोघांना अडविले. त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

10 जणांविरोधात गुन्हा

विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री व आमदारांमधील वादानंतर गोंधळ उडाला. यावेळी सुवर्णसौधमध्ये गेलेल्या काहींनी आमदार सी. टी. रवी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी 10 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

Call For Khanapur Bandh

Call For Khanapur Bandh

Call For Khanapur Bandh

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *