बेळगाव : बसप्रवास दरात % टक्के वाढ करण्याची शिफारस @कर्नाटक

Belgaum Belgavkar
2 Min Read

Bus fares to be hiked in Karnataka? KSRTC sends proposal

15% hike in bus fares #KSRTC

BMTC, KSRTC want at least 15% hike in bus fares

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), बेंगळूर शहर परिवहन मंडळ (बीएमटीसी) सह राज्यातील चारीही परिवहन निगममधील बसप्रवास दरात 15 टक्के वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्या नेतृत्त्वाखालील उच्चस्तरीय समितीने सरकारकडे ही शिफारस केली आहे (Karnataka State Road Transport Corporation ( KSRTC ) administrative board has proposed a bus fare increase of 15 percent).

परिवहन निगमांनी 2020 पासून प्रवास दरात वाढ न केल्याने नुकसानसोसावे लागत आहे. वर्षाला 3,650 कोटी रुपयांचा भार पडत असून प्रवास दरवाढीमुळे हा भार 1,800 कोटी रुपयांनी कमी होईल, असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. महिलांकरिता मोफत बसप्रवासाची शक्ती योजना जारी झाल्यापासून बसप्रवाशांच्या संख्येत 80 लाखांवरून 1.05 कोटीपर्यंत वाढ झाली आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीबरोबरच परिवहन निगमने उत्पन्न वाढीसाठी पावले न उचलल्यास प्रवाशांना पायाभूत सुविधा पुरविणे कठीण होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने केंद्र सरकार सवलतीच्या दराने पुरवत असलेल्या इलेक्ट्रिक बसेसना प्राधान्य द्या, वाहनांना जीपीएस उपकरण जोडणी करा, ई-प्रशासन व्यवस्थेवर भर द्या, असे सल्लेही देण्यात आले असून नियोजित कालावधीत ठोस कार्यक्रम हाती घेण्याची सूचना परिवहन निगमना देण्यात आल्याचे समजते.

बैठकीत परिवहन खात्याचे सचिव एन. व्ही. प्रसाद, परिवहन निगमांचे व्यवस्थापक व्ही. अन्बुकुमार, आर. रामचंद्रन आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

#Karnataka #BusFareHike #KSRTC #BMTC #PublicTransport #TransportNews #KarnatakaTransport #BusTravel #FareIncrease #SustainableTransport #ElectricBuses #TransportPolicy #CommuterLife #TravelInKarnataka #KarnatakaGovernment #PublicTransportSystem #TransportInfrastructure #KarnatakaNews #FareProposal #CommuterAwareness

Bus fares to be hiked in Karnataka
Bus fares to be hiked in Karnataka

Bus fares to be hiked in Karnataka

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *