बेळगाव : तोंड बंद ठेण्यासाठी ₹ 150 कोटी रुपये @कर्नाटक waqf report

Belgaum Belgavkar
2 Min Read

Bribe charge over waqf report

Congress leaders offered bribes to close case, claims Manippady

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : काँग्रेस आमदार अन्वर माणिप्पाडी यांना वक्फबाबत तोंड बंद करण्यासाठी भाजपने ₹ 150 कोटी रुपयांचे आमिष दाखवल्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी वक्फ वादामध्ये काँग्रेसच्या बचावाचा प्रश्नच नाही. याचा तपास केल्यास सरकारचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी भाजपच्या मागणीनुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास सरकार तयार असल्याचे म्हटले आहे.

 

Tried to bribe Minority Commission head with Rs 150 crore on Waqf issue

भाजपची सत्ता असताना वक्फ अतिक्रमणाचा अहवाल दडपण्यासाठी कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिप्पाडी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रदेश भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी रविवारी फेटाळून लावला (त्यावेळी वडील बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री होते) आहे.

 

- Advertisement -

 

विजयेंद्र यांनी येथील मल्लेश्वरम भाजप कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, वक्फ जमिनींवर अतिक्रमण केल्याने संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. हा वाद मोठा आहे. या प्रकरणात तोंद बंद करण्यासाठी काँग्रेस नेत्याला कोट्यवधींचे आमिष दाखवून सरकारचा बचाव का करावा? काँग्रेस नेते विनाकारण आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची चौकशी सरकारने केली तर त्यास सहकार्य केले जाईल.

माजी मुख्यमंत्री आणि येडियुराप्पा यांच्याकडून माणिप्पाडी यांना वक्फ प्रकरणी गप्प राहण्यासाठी 150 कोटींची ऑफर देण्यात आल्याविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, भाजपने याआधी प्रमाणेच आमिषे दाखवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी ते करत असतील तर तसा निर्णय घेण्यात येईल.

 

#Waqf #Bribe #Corruption #Congress #BJP #Karnataka #PoliticalScandal #AnwarManipadi #CBI #Investigation #Belgaum #MinorityCommission #Vijayendra #Siddaramaiah #Protest #Accountability #Transparency #Justice #PoliticalDebate #PublicInterest #GovernmentIntegrity

Bribe charge over waqf report

Bribe charge over waqf report

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *