UK politicians urge England to boycott Afghanistan at Champions Trophy
England asked to boycott Afghanistan in Champions Trophy
Why ICC didn’t ban Afghan men’s team despite Taliban takeover
Champions Trophy 2025 : ‘या’ देशाविरुद्ध संघाने खेळू नये
पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरु होणार आहे, वेळापत्रकही जाहीर झाले आहे, भारताचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार दुबईत खेळवले जाणार आहेत. आता सर्व सुरळीत झाले असे वाटत असताना नवीन संकट दारावर दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) डोकेदुखी वाढण्याची ही लक्षणे आहेत. इंग्लंडच्या 160 हून अधिक राजकारण्यांनी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (England and Wales Cricket Board (ECB)) एक विनंती अर्ज पाठवला आहे.
England team urged to boycott game against Afghanistan over Taliban suppression of women’s rights
त्यात त्यांनी पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्ताविरुद्धच्या लढतीवर इंग्लंड संघाने बहिष्कार घालावा, अशी मागणी केली आहे. यामध्ये निगेल फॅरेज, जेरेमी कब्रायन आणि लॉर्ड किनॉक या काही नावाजलेल्या राजकीय नेत्यांचाही समावेश आहे (boycott Afghanistan at Champions Trophy).
इंग्लंडचा संघ पुढील महिन्यात 26 फेब्रुवारीला अफगाणिस्तानविरुद्ध लाहोर येथे सामना खेळणार आहे. इंग्लंडच्या संघाने तो खेळण्यास नकार द्यावा अशी मागणी होतेय. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं राज्य आहे आणि त्यांच्याकडून होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून हे पाऊल उचलणे गरजेचं आहे, असे इंग्लंडच्या राजकारण्यांचे मत आहे.
2021 मध्ये तालिबान सत्तेवर परत आल्यापासून महिलांचा खेळातील सहभाग प्रभावीपणे बेकायदेशीर ठरवला गेला आहे. ज्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) नियमांचे थेट उल्लंघन झाले आहे. 2021 मध्ये महिला संघ विसर्जित होऊनही अफगाणिस्तानच्या पुरुष संघाला आयसीसीने स्पर्धा करण्याची परवानगी दिली होती. ईसीबीने मात्र आता यावर आक्षेप घेण्याची विनंती करणारे जोरदार पत्र संसदेत मांडले आहे.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे की, आम्ही इंग्लंडच्या पुरुष संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना तालिबानच्या हातात असलेल्या अफगाणिस्तानात महिला आणि मुलींशी होणाऱ्या भयानक वागणुकीविरुद्ध बोलण्याची विनंती करतो. आम्ही ECB ला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करण्याची विनंती करतो. आपण लैंगिक वर्णभेदाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.
ECB च्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ईसीबी तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात महिला आणि मुलींशी झालेल्या वागणुकीचा तीव्र निषेध करते. आयसीसीच्या घटनेनुसार सर्व सदस्य राष्र्टे महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आणि विकासासाठी वचनबद्ध आहेत. या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, ECB ने अफगाणिस्तानविरुद्ध कोणतेही द्विपक्षीय क्रिकेट सामने न खेळण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.
boycott Afghanistan at Champions Trophy
boycott Afghanistan at Champions Trophy