आता Jio, Airtel चे जाणार नेटवर्क ! BSNL 4G विषयी मोठी अपडेट

By Pratiksha Majgaonkar

Published on:

BSNL 4G
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हल्लीच Jio, Airtel, vi यांसारख्या खाजगी कंपन्यांनी आपल्या सेवांचे दर जवळजवळ १५% पर्यंत वाढवले. यात प्रीपेड आणि पोस्ट पेड दोन्ही प्लॅन्सचा समावेश आहे. यामुळे साहजिक रीचार्जच्या किमती वाढल्या आणि लोकं BSNL 4G कडे वळली. BSNL चे प्लॅन्स स्वस्त असल्याने बरेच जण आता BSNL ची सेवा वापरू लागले आहेत. विस्मृतीत गेलेली किंवा जनतेने पाठ फिरवलेली BSNL आता पुन्हा ताठ मानेने उभी राहत आहे. खाजगी कंपन्या Airtel, Jio, Vi यांसारख्या कंपन्यांची आता BSNL शी स्पर्धा दिसून येत आहे. नक्कीच आता या खाजगी कंपन्यांना BSNL चांगलीच टक्कर देणार आहे.

जर तुम्हीही BSNL ग्राहक असाल किंवा BSNL ची सेवा निवडू इच्छित असाल तर ही मोठी बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

BSNL started working on 4G network

या खाजगी कंपन्यांनी वाढविलेल्या सेवा शुल्कामुळे बराच सामान्य ग्राहकांचा वर्ग स्वस्त प्लॅन्स असलेल्या BSNL कडे वळत आहे आणि याचाच फायदा करून घेण्याचे BSNL 4G ने ठरवले आहे. या चालून आलेल्या संधीचे सोने करत BSNL लवकरात लवकर आपले 4G नेटवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि अधिकाधिक लोक BSNL कडे वळावेत म्हणून वेगाने काम करत आहे.

जे लोक आधीच BSNL चे ग्राहक आहेत आणि ज्यांना BSNL 4G च्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे अश्यांसाठी कंपनीने कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल याबाबत खुलासा केला आहे.

25 हजार गावे येणार BSNL 4G network क्षेत्रात

येत्या काही वर्षात BSNL आपले 4G network वाढवणार असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले आहे. यानुसार 2025 च्या मध्यापर्यंत जवळजवळ नवे 1 लाख 4G टॉवर्स BSNL बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्या 25000 गावात इंटरनेट सुविधा अद्याप उपलब्ध नाही ती सर्व गावे दूरसंचार सेवेशी जोडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

BSNL चे स्वदेशी BSNL 4G विकास करण्याचे ध्येय

BSNL 4G ने आत्तापर्यंत 25000 साईट्स स्थापित केल्या आहेत. 2024 अखेरपर्यंत 75000 साईट्स बसवण्याची योजना होती पण 25000 साईट्स आत्तापर्यंत बसवल्या गेल्या आहेत. Jio ने 5G तंत्रज्ञानात प्रगती केली असली तरीही 4G तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी अजूनही आपण बाह्य विक्रेत्यांवर अवलंबून आहोत. म्हणूनच BSNL चे स्वदेशी 4G विकासात अग्रेसर होण्याचे ध्येय आहे आणि 5G विकासाची चाचणी देखील सुरू आहे.

Bsnl Plan Details Maharashtra

BSNL ने आपला 84 दिवसांचा प्लॅन फक्त आणि फक्त 485/- रुपयांमध्ये ठेवला आहे. यात ग्राहकांना 1.5 GB data (प्रतिदिन), 100 SMS (प्रतिदिन) आणि unlimited calling मिळणार आहे. यातच बोनस म्हणून महानगर टेलिफोन निगम लिमिटेड नेटवर्कवर मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंग आणि डेटा लाभांचा समावेश असणार आहे.

Procedure to update BSNL SIM in BSNL 4G

  1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये BSNL SIM Install करा म्हणजेच सिम इन्सर्ट करा.
  2. त्यांनतर मोबाईल रिस्टार्ट/ Reboot करा.
  3. नेटवर्क येईपर्यंत जरावेळ वाट पहा.
  4. नेटवर्क आल्यावर 1507 हा नंबर डायल करा.
  5. नंतर आलेली तुमची माहिती पडताळून पाहा.
  6. आता तुमचे BSNL SIM Active झालेले असेल.

सर्व काम ऑनलाईन झाले आणि नेटवर्क ही देखील एक मूलभूत गरज बनली. आधी एक साधा मेसेज पोहोचायला लागणारी पाच ते दहा मिनिटे कुठे आणि आत्ता अगदी फोटो, व्हिडिओ पाच सेकंदात पोहोचतात तो वेळ कुठे! जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसे नेटवर्क update होत राहिले. कमीतकमी वेळात data transfer, save आणि manage होऊ लागला. आजच्या काळाची ही गरजच बनली आहे.

पूर्वी मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा होत्या. कालांतराने त्यात शिक्षण आणि आरोग्याची भर पडली आणि आता तर नेटवर्कची देखील त्यात भर पडली आहे. नेटवर्क स्लो झाले किंवा साईट डाऊन झाली की त्याचे काय परिणाम होतात हे आपण अनुभवलेले आहेच.

अखंड आणि फास्ट सुविधा मिळण्यासाठी आपण चांगल्यातली चांगली कंपनी निवडून त्या कंपनीचे नेटवर्क वापरतो. यात Vi, Airtel, Jio यांसारख्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे नेटवर्क provider company त्यांच्या सेवेसाठी आपल्याकडून किती मूल्य आकारते तो!


FAQ

  1. How can I activate BSNL 4G VoLTE ?

    Type ACT VOLTE in capital and send it to 53733 four times.

  2. Which cities are 4G enabled in BSNL ?

    Delhi, Mumbai, Kolkata and Chennai

  3. How many BSNL 4G are in Maharashtra district ?

    13 districts


2 thoughts on “आता Jio, Airtel चे जाणार नेटवर्क ! BSNL 4G विषयी मोठी अपडेट”

Leave a Reply