Bigg boss marathi season 5 News – हा प्रश्न सर्वांनाच पडतो कि, बिग बॉस मराठी मध्ये जे स्पर्धक असतात त्यांना मानधन किती मिळते. बिग बॉस सारखे जे शो असतात ते मर्यादित कालावधी साठी असतात त्यामुळे टीव्ही चनेलवाले यामधील स्पर्धकांना पूर्ण शो ची एक ठराविक रक्कम ठरवून पेड करतात आणि हि रक्कम स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार मिळते. बिग बॉस हा शो पहिल्यांदा हिंदी मध्ये आला आणि या शोचा होस्ट सलमान खान होता, हा हिंदी शो खूपच लोकप्रिय झाला. त्यानंतर मराठी मध्ये हि बिग बॉस शो काढण्यात आला, तो हि खूप लोकप्रिय झाला.
बिग बॉस (Bigg boss marathi season 5) शोमध्ये काय करावे लागते
बिग बॉस (Bigg boss marathi season 5) मध्ये काही स्पर्धक मानधन घेऊन गेतले जातात. आणि त्यांनी बिग बॉस च्या घरात जाऊन दिलेल्या कालावधीमध्ये सर्वांशी चांगले राहायचे असते, तसेच वेळेनुसार प्रत्येकाला काहीतरी टास्क दिल्या जातात ज्या स्पर्धकाला पूर्ण कराव्या लागतात. जो पर्यंत शोमध्ये आहे तो पर्यंत स्पर्धकाला बाहेरच्या जगाशी काहीही संबंध ठेवता येत नाही. सर्व स्पर्धकांवर सी.सी.टी व्ही. कॅमेरा मार्फत लक्ष ठेवले जाते. हे सर्व शुटींग टी.व्ही. मध्ये दाखवले जाते. तसेच थोड्या थोड्या कालावधीने एक एक स्पर्धक शोमधून बाहेर काढला जातो. शेवटी जो राहतो त्याला बिग बॉस चा विजयी घोषित केले जाते.
बिग बॉस मराठी ५ मध्ये कोण कोण स्पर्धक आहेत- Bigg boss marathi season 5 contestants
बिग बॉस मराठी भाग ५ (Bigg boss marathi season 5) हा शो आपला मराठी कलाकार श्री. रितेश देशमुख हा करत आहे. बिग बॉस मराठी भाग ५ मध्ये एकूण १६ स्पर्धकांची नावे जाहीर झाली होती. त्यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षाउसगावकर, मराठी टी.व्ही. शो मधील निखील कांबळे, प्रसिद्ध युटयूबर अंकिता प्रभू वालवालकर, आपला मराठी हास्य सम्राट पंढरीनाथ कांबळे उर्फ प्याडी, प्रसिद्ध उद्योजक शुभंकर तावडे, आपली मराठी धकधक गर्ल अभिनेत्री मानसी नाईक, इंडियन आयडल एक चा विजेता अभिजित सावंत, मुळची रशियन पण मराठी इंडस्ट्री मधील नवीन चेहरा इरिना रुदाकोवा, बॉडी बिल्डर अरबाज शेख, टीव्ही शो अक्टर वैभव चव्हाण, दीपिका पदुकोन ची डिझायनर समीक्षा टक्के, टीकटोक स्टार धनंजय पवार आणि सुरज चव्हाण, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, तसेच जान्हवी किल्लेकर हे आहेत.
कोणाला किती मानधन मिळते – Bigg boss marathi season 5 contestants salary
हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉस (Bigg boss marathi season 5 ) च्या स्पर्धकांना पूर्ण सिरीज चे मानधन दिले जाते. परंतु मराठी स्पर्धकांचे मानधन हे खूप कमी असते. त्याचप्रमाणे त्यांच्या लोकप्रियतेनुसार मानधन दिले जाते. बिग बॉस ५ मध्ये कोणाला किती मानधन दिले आहे ते पाहूयात. वरील स्पर्धाकामधील बिग बॉस ५ साठी अंकिता वालावलकर हिला दर आठवड्याला 50 हजार रुपये, धनंजय पवार याला ६० हजार रुपये, सुरज ला २५ हजार रुपये, घनश्याम दराडे याला ४० हजार रुपये इतके मानधन मिळते.
त्याचप्रमाणे काही फेमस सेलिब्रिटी आहेत त्यांना आठवड्याला लाखात मानधन मिळते. यामध्ये बिग बॉस ५ साठी निक्की तांबोळी हिला आठवड्याला ३.७५ लाख रुपये, वर्ष उसगावकर हिला २.५ लाख रुपये, अरबाज पटेल याला १.२५ लाख रुपये तसेच इंडियन आयडोल १ चा विनर अभिजित सावंत याला ३.५ लाख रुपये बिग बॉस ५ साठी मिळतात.
बिग बॉस हिंदी साठी स्पर्धकांना किती मानधन मिळते
वरील मराठी बिग बॉस ५ च्या स्पर्धकांना एवढे मानधन मिळते हे वाचल्यावर सर्वांच्या मनात हा विचार आलाच असेल की, हिंदी मधील बिग बॉस साठी स्पर्धकांना किती मानधन मिळते. बिग बॉस हिंदी साठी हि आठवड्याला लाखोचे मानधन दिले जाते. हिंदीमधील बिग बॉस भाग १७ झाला त्यातील स्पर्धकांचे मानधन खालील प्रमाणे देण्यात आले होते.
अंकिता लोखंडे – १२ लाख/ आठवडा, ऐश्वर्या शर्मा – १२ लाख / आठवडा, मानणारा चोप्रा – १० लाख / आठवडा, मुनावर फारुकी – ८ लाख / आठवडा, नील भट्ट – ८ लाख / आठवडा, जीग्ना वोरा – ७.५ लाख / आठवडा, इशा माल्विया – ७.५ लाख / आठवडा
त्याचप्रमाणे बाकीच्या स्पर्धकांना ३.५ लाखापासून ते ६.५ लाखांपर्यंत मानधन दिलेले आहे. बिग बॉस हिंदी भाग १७ टीव्ही वर आपल्याला मागच्या वर्षी म्हणजेच १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी पहायला मिळाला होता.
2 thoughts on “बिग बॉस मराठी मध्ये जे स्पर्धक असतात त्यांना मानधन किती मिळते 2024 – bigg boss marathi season 5 contestants salary”