Big Boss Marathi Season 5 हा कलर्स मराठीवरील गाजलेले कार्यक्रम अखेर ७० दिवसातच बंद करण्याची वेळ आली आहे. यामागे एक मोठे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे तर बिग बॉस मराठी सिजन ५ हा कार्यक्रम १०० दिवसाचा होता परंतु तो आता ७० दिवसातच बंद करण्यात येत आहे.
हिंदी पुढे झुकावे लागले मराठी
असे बोलले जात आहे कि, Big Boss Marathi Season 5 या कार्यक्रमाला हिंदी चे ग्रहण लागले. कारण काहीच दिवसात हिंदी बिग बॉस १८ सीजन येत आहे त्यामुळे Big Boss Marathi Season 5 हा कार्यक्रम अर्ध्यावर म्हणजेच ७० दिवसातच बंद होत आहे. यावर रितेश देशमुख म्हणतात कि, चेनल चे असे म्हणणे आहे कि, आपल्या Big Boss Marathi Season 5 ची टी.आर.पी. सध्या खूप वाढली आहे, मागील सीजन च्या मानाने या सीजन ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. परंतु काही दिवसातच हिंदी बिग बॉस सीजन १८ येतोय त्यामुळे आपली टी.आर.पी. कशाला कमी करायची, यामुळे हा सीजन शंभर दिवसांऐवजी सत्तर दिवसातच बंद करत आहोत.
दुसरे कारण स्वतः रितेश देशमुख
हिंदी बिग बॉस १८ हे हि खूप मोठे कारण आहेच त्याचप्रमाणे आपल्या रितेश भाऊंना Big Boss Marathi Season 5 च्या शुटींग साठी वेळच नाही. भाऊंना वेळ नसल्यामुळे या आठवड्यात भाऊंचा धक्का हा भाग झालाच नाही. बिग बॉस मराठी सीजन 5 का कार्यक्रम थोड्याच दिवसात खूपच लोकप्रिय झाला आहे. तसेच लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला भरभरून प्रेम दिले यासाठी सर्वांचे धन्यवाद.
फायनल लवकरच होणार
Big Boss Marathi Season 5 हा कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम अनेक कारणामुळे बंद होत आहे. याचमुळे या सीजन ची फायनल ६ आक्टोंबर लाच होणार आहे आणि या लोकप्रिय कार्यक्रमाचा द एंड होईल. बिग बॉस मराठी सीजन ५ च्या विनर ची नाव हि सोशियाल मेडिया वर व्हायरल झाले आहे. या यादीनुसार अभिजित सावंत विजेता दाखवण्यात आले आहे. परंतु पाहूयात कोण विजेता होतेय ते.