बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणारी ही निक्की तांबोळी आहे तरी कोण? – Big Boss Marathi 5

By Swamini Chougule

Published on:

Big Boss Marathi 5
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Boss Marathi 5 चा तिसरा आठवडा सुरू झाला आणि तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा निक्की तांबोळीने धुमाकूळ घातला आहे. पॅडीने निक्कीच्या कपड्यांना हात लावला म्हणून तिने भांडण काढले. पॅडी आणि तिच्यात बाचाबाची झाली आणि निक्कीने बाकी लोकांचे कपडे ही काढून फेकले.

पण Big Boss Marathi 5 घरात धुमाकूळ घालणारी ही निक्की तांबोळी आहे तरी कोण?

निक्की तांबोळी ही मूळची औरंगाबादची असून तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे संपूर्ण शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये झाले असून निक्कीचे वडील एक व्यवसायिक आहेत. निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिने काही टी. व्ही जाहिरातीत काम केलं. साऊथ इंडस्ट्रीतुन तिच्या चित्रपट करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर तिने अनेक साऊथचे चित्रपट केले आहेत. आजपर्यंत तिचा सगळ्यात गाजलेला चित्रपट ‛कांचना 3’ हा आहे.

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाले भावाचे निधन
    • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निक्कीच्या एकुलत्या एक भावाचे निधन झाले त्यामुळे ती खचली होती. तिने या दुःखातुन बाहेर पडण्यासाठी तिचे काम ब्रेक न घेता सुरू ठेवले.
  • मराठी बिग बॉसमध्ये बोल्डनेसची फोडणी
    • निक्कीच्या रुपात बिग बॉसच्या नवीन सिजनमध्ये बोल्डनेसची झणझणीत फोडणी पडणार आहे. कारण निक्कीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहिले तर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. आणि या बोल्डनेसमुळे अनेकदा तिच्यावर टीका होते.
  • हिंद बिग बॉस 14 मध्ये घेतला होता भाग
    • निक्की तांबोळी हिंदी बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये ही दिसली होती.पण हिंदी बिग बॉसमध्ये तिला विजेते पद पटकावता आले नाही. आता मराठी बिग बॉसमध्ये ती विजयी होण्यात यशस्वी होते की नाही ते पाहण्यासारखे आहे.
  • निक्की आणि अरबाज यांची लव केमस्ट्री
    • गेल्या दोन आठवड्यापासून आपल्याला निक्की तांबोळी आणि अरबाजची लव केमस्ट्री पाहायला मिळत आहे. आता हे प्रेम बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकून राहते आणि प्रेक्षकांना एक छान लव स्टोरी पहायला मिळेल की ही जोडी पुढे जाऊन फुटणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

निक्की आणि अभिजितची मैत्री – Big Boss Marathi 5

निक्की तांबोळी आणि अभिजित सावंत हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध टीममध्ये खेळत असले तरी दोघांमध्ये चांगली मैत्री होताना दिसत आहे.अभिजित सावंत या मैत्रीमध्ये खूपच सिरीयस असल्याचे दिसून येते पण अरबाजला मात्र त्याची आणि निक्कीची मैत्री खास पसंत आहे असे दिसत नाही. अरबाज त्याबाबत हिट मीटरवर निक्कीवर राग काढताना ही रविवारी दिसून आले. आता अरबाजच्या भावनांना न जुमानता निक्की अभिजित बरोबरची मैत्री तशीच ठेवते की अरबाजचे ऐकून मागे फिरते हे पाहण्यासारखे आहे.

निक्की आणि जानवीची खास मैत्री – Big Boss Marathi 5

निक्की तांबोळी आणि जानवीची खास मैत्री आपल्याला पहिल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. रविवारी रितेश देशमुखने जानवी निक्कीच्या मागे तिच्या विराधात बोलल्याचे सांगितले होते पण त्याचा त्या दोघींच्या मैत्रीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आलेलं नाही.आता बिग बॉसच्या या घरात सतत नात्यांची समीकरणे बदलत असतात तिथे या दोघींची ही मैत्री किती दिवस टिकते हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.

निक्की आणि घनश्यामचे नाते – Big Boss Marathi 5

निक्की घनश्यामला तिचा भाऊ म्हणते पण घनश्यामच्या मनात निक्कीबद्दल नेमक्या काय भावना आहेत हे मात्र अजून कोणालाही समजलेलं नाही.

निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकरचा छत्तीसचा आकडा

एकेकाळी मराठी बरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा डंका वाजवलेल्या जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर या मराठी बिग बिसमध्ये (Big Boss Marathi 5) आपल्याला दिसत आहेत. पण शो सुरू झाल्यापासून निक्की तांबोळी त्यांचा अपमान करताना दिसून येत आहे. त्यांच्या जेष्ठ आणि श्रेष्ठ असण्याचा ती आणि तिची टीम कोणताच मान राखताना दिसत नाही. आणि त्या आधी निक्कीने त्यांचा बऱ्याच वेळा अपमान करताना दिसून आले आहे.निक्कीच्याच पावलावर पाऊल ठेवत गेल्या आठवड्यात ही तिच्या टीमच्या जानवीने त्यांचा अपमान केला.

ref – Asianet Newsable



Big Boss Marathi 5 नावाच्या चक्रव्यूहात सुरवातीला जुळलेली नाती आणि समीकरणे तशीच राहत नाहीत. येणाऱ्या दिवसा गणिक ती बदलत जातात. आता निक्कीने निमार्ण केलेली ही नाती मग ती मैत्रीची असो वा शत्रुत्वाची किती दिवस तशीच राहणार आहेत हे मात्र पाहण्या सारखे आहे. निक्की आणि अरबाजची लव केमस्ट्री, निक्की आणि जानवीची मैत्री, निक्की आणि अभिजितची मैत्री, घनश्यामबरोबर निक्कीचे बहिणीचे नाते आणि सगळ्यात विवादित असलेलं निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांचे शत्रुत्वाचे नाते!निक्की तांबोळीच्या भोवती फिरणारी ही सगळी नात्यांची समीकरणे तशीच राहणार की काळानुसार बदलत जाणार हे पाहायला मजा येणार आहे. कारण बिग बॉसचे (Big Boss Marathi 5) घर हे असे ठिकाण आहे की इथे कधी जिगरी दोस्त जानी दुष्मन बनतील आणि केंव्हा जानी दुष्मन जिगरी दोस्त बनतील सांगता येत नाही.

FAQ

Why is Nikki Tamboli famous?

Hailing from Aurangabad, Maharashtra, India, Nikki is currently inside the Bigg Boss Marathi house.

Who are the parents of Nikki tamboli?

Her mother is Pramila Bodkhe Tamboli, and her father is Digambar Tamboli

Who is Nikki Tamboli best friend?

Nikki Tamboli mourns the loss of her close friend Shikha through a heartfelt note, expressing deep sorrow and longing for their irreplaceable bond.

2 thoughts on “बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणारी ही निक्की तांबोळी आहे तरी कोण? – Big Boss Marathi 5”

Leave a Reply