Big Boss Marathi 5 च्या पाचव्या सिझनमध्ये वाहिनीने ही धुरा स्त्रियांचा आणि तरुणांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांच्याकडे सोपवली. रितेश देशमुख यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा हा पहिलाच असा कार्यक्रम आहे, ज्यात ते होस्ट आहेत. रितेश यांचे आदराने बोलणे, त्यांचे विचार, त्यांचे सोशल मीडियावरचा वावर, पत्नीसोबतचे रिल्स आणि पत्रकारांसोबतचे वागणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरत आहे. महाराष्ट्राचा लाडका दादा असा रितेश देशमुख यांना म्हटलं जातं.
कलर्स वाहिनीवरील Big Boss हा कार्यक्रम परदेशातील बिग ब्रदर कार्यक्रमावर आधारित आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे चार सिझन प्रोड्युसर, अभिनेता, दिग्दर्शक श्रीयुत महेश मांजरेकर सरांच्या नावावर जमा आहेत. बोलण्यातला फटकळपणा, परखडपणा त्यांनी हा कार्यक्रम होस्ट करताना दाखवून दिला.
महेश मांजरेकर की रितेश देशमुख
प्रोमोमध्ये रितेश देशमुख यांना पाहिल्यावर महेश मांजरेकर प्रेमींच्या कपाळावर आठ्या पडल्या. तसा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळाला. पण ‘रितेश आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले’ असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज बिग बॉस सिझन ५ च्या दुसऱ्या आठवड्यात ‘आजवरचा हा सर्वात जास्त रेटिंग असलेला सिझन आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडतंय’ असं सांगताना रितेशसोबतच सदस्यांचा आनंद द्विगुणित झालेला पाहावयास मिळाला. या सिझनमध्ये सदस्यांचा सहभाग जितका महत्त्वाचा आहे तितकाच रितेश देशमुख हे नावसुद्धा महत्वाचे आहे.
काय घडलं दुसऱ्या विकेंडला (Weekend in Big Boss Marathi 5)
गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही दंगाखोर टीमची रितेशने हजेरी घेतली. त्याचसोबत शांत टीमच्या नेभळटपणावर ही ताशेरे ओढले. रितेशने उचललेले मुद्दे हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत, किंबहुना प्रेक्षकांच्या मनातली खदखद रितेश व्यक्त करतो असं प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या आठवड्यात सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेल्या अक्षय कुमार आणि टीमने कार्यक्रम रंगतदार होण्यास हातभार लावला.
फक्त आवाज ऐकवणारे Big Boss Marathi 5 स्टेजवर अवतरले
‘बिग बॉस माझे नवरे आहेत’ असं म्हणणाऱ्या आर्या आणि जान्हवीला यावेळी डमी बिग बॉस दाखवण्यात आले. बिग बॉस यांना पाहता येणार म्हणून उत्साहात असणाऱ्या सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले. एक वयस्कर व्यक्ती अक्षय कुमार यांनी बिग बॉस म्हणून पेश केल्यावर सगळ्यांना धक्का बसला. अक्षय कुमार यांनी प्रॅंक केला हे सर्व सदस्यांच्या लक्षात आले.
नॉमिनेशन in Big Boss Marathi 5
या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट करण्यात आले होते. भाऊच्या धक्क्यावर रितेशने, यातील निक्की, सूरज आणि योगिता हे तिघे सेफ असल्याचे सांगितले. नंतर उत्कंठा वाढवून ठेवत घनश्याम (छोटा पुढारी), पंढरीनाथ (पॅडी) आणि निखिल दामले या तिघांमधून निखिल सेफ असल्याचे सांगून इतरांच्या हृदयाची धडधड वाढवली. शेवटी घनश्याम आणि पंढरीनाथ कांबळे हे दोघेही सेफ असल्याचे सांगितले तेव्हा सर्व सदस्यांनी एकच कल्ला केला.
दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेशन का नाही ? in Big Boss Marathi 5
Big Boss Marathi 5 घरात एकूण सोळा सदस्य होते. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा घराच्या बाहेर पडल्यावर उरलेल्या पंधरा जणांमधून घनश्याम घराबाहेर जाईल अशी दाट शक्यता प्रेक्षकांनी वर्तवली होती. पण, या आठवड्यात कलर्स मराठी वाहिनी आपल्या नव्या रुपात दाखल होत आहे. नवा रंग आणि लोगो घेऊन ही वाहिनी आपल्यासाठी सज्ज झाली आहे. पहिली झलक आणि त्याची घोषणा काल रितेशने भाऊच्या धक्क्यावर केली. हा एक आनंद सोहळा असल्याचे रितेश म्हणाला. आनंदाच्या क्षणी कोणत्याही सदस्यांचे एलिमिनेशन झाल्यास ते योग्य दिसणार नाही. म्हणून दुसऱ्या आठवड्यात एकाही सदस्याचे एलिमिनेशन करण्यात आले नाही.
पुढच्या आठवड्यात कोण जाणार Big Boss Marathi 5 मधून
दुसऱ्या आठवड्यात जे सदस्य नॉमिनेट झाले होते त्यांचं नॉमिनेशन तिसऱ्या आठवड्यात तसंच असणार आहे. निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, घनश्याम (छोटा पुढारी) ह्या सहा सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार कायम आहे. सोशल मीडियावर व प्रेक्षकांच्या मनात घनश्यामबद्दल राग दिसून येतो. त्यामुळे घनश्याम (छोटा पुढारी) पुढच्या आठवड्यात घराबाहेर जाईल असं प्रेक्षकांचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे योगिता चव्हाण हिने “मला घराबाहेर जाऊ द्या, मला इथे जमत नाही” असं भाऊच्या धक्क्यावर आलेल्या रितेशला सांगितले. त्यामुळे काही प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, योगिता चव्हाण तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर जाईल.
कोण आहेत योगिता चव्हाण
योगिता चव्हाण ही कलर्स मराठी वाहिनीवरील “जीव माझा गुंतला” या मालिकेत मुख्य कलाकार होती. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारी तडफदार मुलीची भूमिका तिने या मालिकेत केली होती. त्यात तिच्यासोबत मुख्य कलाकार असणाऱ्या सौरभ चौगुलेसोबत तिने नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नाला फक्त पाच महिने पूर्ण झालेत आणि योगिताने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. एकाच कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींसोबत दोन दिवस राहिल्यानंतर योगिता घरच्या आठवणीने हळवी झाली. तिने कॅप्टन निवडण्याच्या प्रक्रियेत “अंकिता वालावलकर” हिला कॅप्टन घोषित करुन बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा पहिला कॅप्टन दिला. त्यानंतरच्या टास्कमध्ये किंवा घरात योगिता फारशी उत्साही दिसत नाही. शेवटी दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर तिने रितेशला ‘घराबाहेर बोलवा’ अशी विनंती केली.
आता पुढच्या आठवड्यात कळेल (Big Boss Marathi 5) कोण घराबाहेर जाणार आहे ते, योगिता की घनश्याम?
1 thought on “Big Boss Marathi 5- नो एलिमीमेशन”