Bhojpuri Folk Singer ‘Forced’ to Apologise for Singing Gandhi’s Favourite Bhajan
- गायिकेला मागावी लागली माफी
- भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ
Mahatma Gandhi’s favourite bhajan “Ishwar Allah Tere Naam”
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भोजपुरी गायिकेनं गायलेल्या भजनामुळे वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक असलेलं ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे भजन भोजपुरी गायिका देवी यांनी गायलं.
Controversy over Song Ishwar-Allah Tero Naam | BJP Bihar Program
यावरून कार्यक्रमात गोंधळ झाला आणि उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या विरोधानंतर गायिकेला माफी मागावी लागली. बिहारची राजधानी पटना इथं लोकगायिका देवी यांना रघुपती राघव राजाराम गायल्यानं माफी मागण्याची वेळ आली. कार्यक्रमात देवी यांनी भारत माता की जय, अटल बिहारी वायजपेयी अमर रहे अशा घोषणा दिल्या. त्यानतंर भजन गायला सुरुवात केली. पण भजन सुरू होताच उपस्थित लोक नाराज झाले.
गायिका देवी यांनी कार्यक्रमात गांधीजींचं आवडतं भजन रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम गाण्यास सुरुवात केली. गायिका देवी यांनी जेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम असं म्हटलं तेव्हा तिथले लोक नाराज झाले. कार्यकर्त्यांनी जोरजोरात गोंधळ घालत ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजीही केली. आयोजकांनी सभागृहात गोंधळ होताच कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आयोजकांच्या हस्तक्षेपानंतरही कार्यकर्त्यांचा गोंधळ कमी झाला नाही.
तेव्हा गायिका देवी यांनी भारतीय संस्कृतीच्या संदर्भात वसुधैव कुटुंबकम म्हणत हिंदूच असे आहेत जे सर्वांना आपल्यात सामावून घेतात असं म्हटलं. मात्र तरीही त्यांनी शेवटी माफी मागावी लागली.
राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, पटनात गांधीजींचं आवडतं भजन रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम गायलं तर नीतीश कुमार यांचे सहकारी भाजपवाल्यांनी गोंधळ घातला. भजनामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर गायिका देवी यांना माफी मागावी लागली.
Bhojpuri Folk Singer Apologise BJP Bhajan
Bhojpuri Folk Singer Apologise BJP Bhajan
Bhojpuri Folk Singer Apologise BJP Bhajan