‘इंडिया गेट’चे नाव बदलण्याची मागणी

Belgaum Belgavkar
2 Min Read

Bharat Mata Dwar’? BJP Minority Morcha chief asks Modi to rename India Gate

Rename India Gate as ‘Bharat Mata Dwar’

 

  • BJP leader appeals to PM Modi
  • थेट मोदींना पत्र लिहून सुचवलं खास नाव…

मागील काही वर्षांमध्ये अनेक वास्तू, ठिकाणे आणि शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या नावात बदल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आता इंडिया गेटच्या नावात बदल करण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यालाही भाजप नेतेच कारणीभूत ठरले आहेत.

 

Bharat Mata Dwar

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. इंडिया गेट हे नाव बदलून भारत माता द्वार हे नाव द्यावे, असे सिद्दीकी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या मागणीमुळे चर्चेला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

जमाल सिद्दीकी यांनी पत्रात लिहिले आहे की, तुम्ही क्रुर मुघल औरंगजेबाचे नावाने असलेल्या रस्त्याचे नाव बदलून ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता केले. इंडिया गेटवरील किंग जॉर्ज पंचमची मुर्ती हटवून सुभाषचंद्र बोस यांची मुर्ती उभारली. राजपथाचे नाव कर्तव्य पथ केले. त्याचप्रमाणे इंडिया गेटचे नाव बदलून ‘भारत माता द्वार’ करावे. इंडिया गेटच्या ऐवजी भारत माता द्वार नाव दिल्याने त्या स्तंभावरील हजारो शहीद देशभक्तांना खऱ्याअर्थाने श्रध्दांजली वाहिली जाईल. माझ्या प्रस्तावाचा विचार करून भारत माता द्वार असे नामकरणे करावे, असे जमाल सिद्दीकी यांनी पत्रात नमूद केले.

 

इंडिया गेटला युध्द स्मारक म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी शहीद भारतीय सैनिकांना श्रध्दांजली वाहिली जाते. प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटपासूनच परेड सुरू होते. या परेडमध्ये तिन्ही दलाचे जवान सहभागी होतात. तसेच विविध राज्यांची सांस्कृतिक झलकही यावेळी पाहायला मिळते. पर्यटकांसाठी इंडिया गेट हे महत्वाचे आकर्षण आहे.

 

 

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *