International Daughters Day 2024:- Daughters Day अर्थात कन्या दिवस हा जगभरात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. मुला – मुली मधील भेदभाव कमी करण्यासाठी, मुलीलाही मुला ऐवढेच जपले पाहिजे आणि समान वागणूक दिली गेली पाहिजे हा विचार दृढ करण्यासाठी Daughters Day साजरा केला जातो.
कन्या दिवस साजरा करण्याचे कारण (Reason Behind Celebrating Daughters Day 2024)
असे मानले जाते की जो खरंच भाग्यवंत आहे त्याच्याच घरी मुलीचा जन्म होतो. हिंदू धर्मात मुलीला देवीचे रूप मानले जाते. घर संसार सांभाळताना ती एक लक्ष्मी असते, मुलांना शिकवताना सरस्वती, सर्व घरातील मंडळींच्या आरोग्याची काळजी करून त्यांना पौष्टिक, ताजे आणि सात्विक अन्न शिजवून देताना ती अन्नपूर्णा असते तर कोणतेही संकट आल्यावर त्याच्याशी लढताना ती दुर्गा होते.
मुलीच्या सन्मानार्थ, जिच्यामुळे घरात हसरे खेळते वातावरण आहे, जिच्यामुळे घराला घरपण आहे अश्या मुलीला आपल्यावरही जीवापाड प्रेम करणारी माणसे आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास दृढ व्हावा यासाठी Daughter’s Day साजरा केला जातो.
कन्या दिनाचा हेतू (Aim Behind Celebrating Daughters Day)
- या दिवसाचा मूळ हेतू हा मुलींना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर विचार करून त्यासाठी ठोस पावले उचलणे आहे.
- ज्या ठिकाणी आजही मुलींना कमी लेखून त्यांचा छळ केला जातो किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते अश्या भागात उपक्रम राबवणे हाही एक हेतू असतो.
- या दिवशी केवळ मुलींचे महत्त्व सांगितले जात नाही तर समाजात मुलींना मान सन्मान, प्रेम आणि आदराची वागणूक मिळावी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
- मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सर्वांगाने सक्षम होण्यासाठी उपक्रम आयोजित केले जातात.
Daughters Day Wishes in Marathi (कन्या दिनाच्या मराठी शुभेच्छा)
या खास दिवशी तुमच्या मुलीला सुंदर शुभेच्छा देऊन खुश करण्यासारखे दुसरे सुख नसेल म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुमच्या मुलीला पाठवून तुम्ही तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू फुलवू शकता.
१. लेक म्हणजे ईश्वराची देणं,
लेक म्हणजे अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी,
सुखही होई अनमोल,
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
२. लेक हे असं फुल आहे जे सगळ्यांच्या बागेत फुलत नाही,
हे फुल माझ्या बागेत फुलले आहे म्हणून देवा तुझा मी आभारी आहे.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
३. पाहुनी रूप गोंडस
मनी माया दाटते,
अशी कळी मग
गर्भातच का नकोशी वाटते?
मुलींना जगवा,
मुलींना वाचवा
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
४. वंशाचा दिवा मुलगा असेल…
पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
५. मुलीला हसताना पाहिलं,
तेव्हा मी विचारलं काय झालं.
तर म्हणाली, बाबांनी
मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय कन्या दिवस शुभेच्छा
(शुभेच्छा credit:- साभार गूगल)
कन्या दिनानिमित्त मुलीला देण्यासाठी नऊ भेट आयडिया (9 Gift Ideas for Daughters Day 2024)
घरातील चैतन्य कायम ठेवण्यासाठी मुलीचा हातभार असतो. ती लहान असताना तिचे चिवचिवणारे बोडबे बोल, दुडूदुडू पळणारी पावले, पैंजणाचा आवाज आणि लाडिक रागावणे हे सर्व घराला घरपण देऊन जातात.
मुळातच समजूतदार आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी लेक सगळ्या घराची लाडकी असते. Daughter’s Day निमित्त तिला छान गिफ्ट देऊन किंवा सरप्राइज देऊन तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हसू वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही छान आणि युनिक पर्याय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमची लाडकी बाहुली नक्कीच खुश होईल.
- लहान मुलींना खेळणी, त्यांच्यासोबत त्यांच्या वयाचे होऊन खेळणे, त्यांच्या कलाने घेत संवाद साधण्याचा प्रयत्न करणे हे करता येऊ शकते.
- मुलींना प्रेम आणि प्रेमाने दिलेली कोणतीही वस्तू खूप अनमोल असते त्यामुळे एक संपूर्ण दिवस फक्त आणि फक्त तिच्यासाठी राखून ठेवून तिच्या आवडीनुसार हा दिवस कुटुंबासोबत घालवला तर ती नक्कीच खुश होणार आहे.
- तुम्ही स्वतः तुमच्या हस्ताक्षरात आणि शब्दात लिहिलेले पत्र नक्कीच आयुष्यभर तिच्यासाठी खास राहील.
- मुलीसोबत बसून तिच्या वयाप्रमाणे येणाऱ्या काळाबद्दल बोलणे, तिचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेऊन सल्ला देणे.
- तुमच्या आयुष्यात तिचे खूप महत्वाचे स्थान आहे आणि ती तुमच्या आयुष्याचा अविभाज्य आहे याची तिला खेळातून किंवा वागण्यातून जाणीव करून देणे.
- भविष्यातील जीवनाविषयी मुलीचे मत ऐकून घेणे, तिची स्वप्ने जाणून घेऊन तिच्या पाठीशी कुटुंब खंबीरपणे उभे असेल याची जाणीव करून देणे.
- ट्रेजर हंट सारखे खेळ खेळून तिला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू भेट देणे.
- तिच्या पुढच्या शिक्षणासाठी एखाद्या लहान रकमेची का होईना पण तिच्या नावाने एफडी करून ती देणे. यामुळे तिला आपले पालक आपल्या शिक्षणाचा खूप विचार करत आहेत ही भावना दृढ होऊन अजून उत्साह निर्माण होईल.
- तिच्या आवडीच्या छंदाच्या एखाद्या क्लासचे ऍडमिशन घेऊन देणे.