Massive Fraud Exposed in Belgaum Village : Hundreds of Women Scammed
बेळगाव—belgavkar—belgaum : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या महिलेविरोधात कठोर कारवाई करावी. गरीब महिलांची झालेली फसवणूक लक्षात घेऊन सरकारने कर्ज माफ करावे, अशी मागणी गोकाक तालुक्यातील नेलगंटी ग्रामस्थांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांनी निवेदन सादर केले.
शेजारील गावाजवळील एका महिलेकडून महिला बचत गट तयार करुन कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले आहे. महिलेने बचत गटांच्या नावाने बँक व फायनान्स मधून, सदस्य असणाऱ्या महिलांच्या आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज मिळवून दिले आहे. प्रत्येक महिलेच्या नावे पन्नास ते एक लाख पर्यंत कर्ज काढण्यात आले आहे. मात्र कर्ज वितरण करताना केवळ दहा ते पंधरा हजार दिले आहेत.
उर्वरित रक्कम कर्ज मिळून देणाऱ्या महिलेने हडप केली आहे. महिला फरार झाली असून कर्जासाठी फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून बचत गट महिलांच्या घरी भेट देऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. याप्रकरणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
#Belgaum #WomenEmpowerment #LoanFraud #SavingsGroup #FinancialScam
#Belgaum #WomenEmpowerment #LoanFraud #SavingsGroup #FinancialScam #Karnataka #WomenSupport #CommunityAction #JusticeForWomen #LoanShark #FraudAwareness #EmpowerWomen #SocialJustice #WomenInFinance #FinancialLiteracy #SupportLocal #WomenRights #GrassrootsMovement #EconomicJustice #FightFraud
Belgaum Women Loan Fraud Savings Group Scam
Belgaum Women Loan Fraud Savings Group Scam