बेळगाव : पैशांच्या फसवणुकीमुळे आत्महत्या

Belgaum Belgavkar
2 Min Read

 

गणेश मंदिरातील पुरोहिताने आत्महत्या केली

बेळगाव—belgavkar—belgaum : आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याने गणेश मंदिरातील पुरोहिताने आत्महत्या केली आहे. मंगळवारी डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. आपली फसवणूक सहन न झाल्याने काही दिवसांपूर्वीच रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. उदयकुमार गुरुनाथ कुरडूर (वय 52, रा. हनुमाननगर) असे त्या दुर्दैवी पुरोहिताचे नाव आहे.

फ्लॅट देण्याचे आमिष, त्यांनी कर्ज काढून पैसे दिले

उदयकुमार यांची पत्नी ज्योती यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून टी. व्ही. सेंटर येथील एकाने आपल्या पतीची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे ज्योतीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. टी. व्ही. सेंटर परिसरातील गणेश मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या उदयकुमार यांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखविल्यामुळे त्यांनी कर्ज काढून एका व्यक्तीला पैसे दिले होते. सुमारे साडेचार लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली होती.

 

- Advertisement -

एक महिन्यापूर्वी त्या पैसे घेतलेल्या व्यक्तीने हात वर केल्यामुळे उदयकुमार यांना धक्काच बसला होता. माहितीनुसार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या घरात चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या करण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लगेच पत्नी ज्योती एपीएमसी पोलीस स्थानकात पोहोचल्या होत्या. पोलिसांनी काळीवेळ शोधा, सापडले नाही तर आमच्याकडे परत या, असे सांगून पाठवले होते. आत्महत्या करण्याचा निर्धार करून घराबाहेर पडलेले उदयकुमार रेल्वेरुळापर्यंतही पोहोचले होते. आत्महत्येचे धाडस झाले नाही. एकुलत्या एक मुलीची आठवण झाल्यामुळे त्याच दिवशी रात्री ते घरी परतले होते.

 

 

कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस स्थानकात नेले होते. त्याचवेळी त्या पैसे घेणार्‍या व्यक्तीला बोलावून चौकशी केली असती तर कदाचित उदयकुमार यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढली. त्यांनी काम करत असलेल्या रेड्डी भवनमधील पदाधिकाऱ्यांनीही त्यांना धीर दिला होता. शेवटी 31 डिसेंबर रोजी विष पिऊन उदयकुमार यांनी आपले जीवन संपविले आहे. टी. व्ही. सेंटर येथील गणेश मंदिराचे पदाधिकारी, सदाशिवनगर येथील रेड्डी भवनचे पदाधिकारी सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तळ ठोकून होते.

Belgaum TV Center Suicide Fraud Money
Belgaum TV Center Suicide Fraud Money

Belgaum TV Center Suicide Fraud Money

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *