Belgaum Tahsildar back to work after court granted him anticipatory bail in SDA suicide case
दोन महिन्यांपासून कार्यालयात हजर झाले नव्हते
बेळगाव—belgavkar—belgaum : तहसील कार्यालयातील द्वितीय दर्जाचे साहाय्यक रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असणारे तहसीलदार बसवराज नागराळ गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात हजर झाले नव्हते. परंतु, नववर्षाचा मुहुर्त साधत बुधवारी त्यांनी कार्यालयात हजर राहून कामकाजाला सुरवात केली.
तहसील कार्यालयातील एसडीए
तहसील कार्यालयातील एसडीए रुद्रण्णा यडवण्णावर यांनी 5 सप्टेंबर रोजी रात्री WhatsApp Group वर संदेश पाठवत कार्यालयातच आत्महत्या केली होती.
याप्रकरणी तहसीलदार नागराळ यांच्यासह तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला. खडेबाजार पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांसह तिघेही फरार होते. अखेरीस तहसीलदार नागराळ यांनी न्यायालयातून जामीन मिळविला. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरु आहे. दोन महिन्यांपासून तहसीलदार नागराळ कार्यालयाकडे फिरकले नव्हते. परंतु, बुधवारी त्यांनी हजेरी लावून कामाला सुरवात केली आहे.
Belgaum Tahsildar back to work
Belgaum Tahsildar back to work