बेळगाव : ₹ 19 कोटींचा गंडा, 8 हजार जणांची फसवणूक; चौघांवर गुन्हा

Belgaum Belgavkar
4 Min Read

संघामार्फत परिसरातील महिला व पुरुषांना कर्जाचे वाटप

बेळगाव—belgavkar—belgaum : एकूण कर्जापैकी 60 टक्के रक्कम आम्ही घेऊ व उर्वरित 40 टक्के रक्कम तुम्हाला देऊ. ही 40 टक्के म्हणजे तुम्हाला दिलेली सवलत असून तुमच्या नावे असलेले 100 टक्के कर्ज आम्ही भरणार, असे म्हणत एका कुटुंबाने स्वसाहाय संघाच्या नावाखाली तब्बल 7 हजार 700 जणांना ₹ 19 कोटी 35 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

40 टक्क रक्कम कर्जदाराला व उर्वरित 60 टक्के

याप्रकरणी शेखा कन्नाप्पा हंचीनमणी (रा. सोनट्टी, ता. बेळगाव) या महिलेने माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विनी होळेप्पा दड्डी, तिचा पती होळेप्पा फकिराप्पा दड्डी, दोन मुली शेवंता होळेप्पा दड्डी व प्रियांका होळेप्पा दड्डी (चौघेही रा. यमनापूर) यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यमनापूर येथे उपरोक्त कुटुंब व अन्य काहीजण मिळून महर्षी वाल्मिकी महिला स्व-साहाय्य संघ चालवत होते. या संघामार्फत परिसरातील महिला व पुरुषांना कर्जाचे वाटप केले जात होते.

1 लाखाचे कर्ज असले तरी तुम्ही ₹₹₹

अशी होती कर्जाची पद्धत : या संघामार्फत सवलतीत कर्ज दिले जाते, असा गवगवा परिसरात केला होता. कर्ज देताना सांगितले जात होते की, जितके कर्ज दिले जाईल, त्यापैकी 40 टक्क रक्कम कर्जदाराला दिली जाईल व उर्वरित 60 टक्के रक्कम कर्ज देणारे स्वतः घेत असत.

 

- Advertisement -

उदाहरणार्थ जर एखाद्याने या संघामार्फत एक लाख रुपये कर्ज घेतले तर त्यापैकी ₹ 40000 रुपयांची रक्कम त्याला दिली जात होती. उर्वरित ₹ 60000 रुपये संबंधित संघातील संचालक स्वतःकडे ठेवून घेत होते. हे कर्ज देताना कर्जदाराला सांगितले जायचे की, जे ₹ 40000 रुपये कर्ज दिले आहे, ते तुम्हाला सवलतीच्या रुपात दिले आहेत. ₹ 60000 रुपये आमच्याकडे राहतील. तुमच्या नावे जरी ₹ 1 लाखाचे कर्ज असले तरी तुम्ही काहीही भरायचे नाही. ही सर्व रक्कम आम्ही भरू, असे सांगून विश्वास दिला जात होता. परंतु, कोणाचेही कर्ज भरले जात नव्हते.

 

ज्यांच्याकडून ठेवीच्या रूपात रक्कम घेतली जात होती, त्यांनाही त्यांच्या ठेवी परत दिलेल्या नाहीत. शिवाय 60-40 अशी कर्जाची विभागणी करून कर्ज दिल्याने तब्बल 7 हजार 707 जणांनी येथून कर्ज उचलले आहे. कर्जदारांना 40 टक्के रक्कम दिली असली तरी संबंधितांच्या नावे 100 टक्के रक्कम कर्जाऊ दाखवत बहुतांश रक्कम संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीच स्वतःसाठी घेतली आहे. यानंतर कर्ज न भरल्याने पुन्हा भरण्याचा तगादा ज्यांच्या नावे कर्ज आहे, त्यांना लावला जात होता.

ही रक्कम सुमारे 19 कोटी 35 लाख 35 हजार 636 रुपये असल्याचे पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये नेमकी कशी फसवणूक झाली आहे, याचा तपास माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्याकडून सुरू आहे.

 

यमनापूरपासून अवघ्या चार किमीवरील हालभावी येथेही यल्लव्वा एम. बन्नीबागी या महिलेनेही अशाचप्रकारे फसवणूक केल्याचा प्रकार 2 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आला होता. यामध्ये तब्बल 2 हजार महिलांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा संशय आहे. ही महिलादेखील फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन देते म्हणून सावज शोधायची. कर्ज मंजुरीचे कमिशन म्हणून ठराविक रक्कम घ्यायची. यानंतर मला जरा अडचण आहे, असे सांगून पुन्हा त्या महिलेच्या कर्जातील काही रक्कम घेऊन याचे हप्ते आपण भरतो, असे सांगत असे. परंतु, तिने कोणाचीही रक्कम भरली नाही. याप्रकरणी काकती पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याकडून तपास सुरू आहे. हे प्रकरण पालकमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

Belgaum Loan Lure Money laundering self-help group Fraud
Belgaum Loan Lure Money laundering self-help group Fraud
Belgaum Loan Lure Money laundering self-help group Fraud

Belgaum Loan Lure Money laundering self-help group Fraud

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *