बेळगाव—belgavkar—belgaum : भरधाव कार नियंत्रण सुटून थेट रस्त्याकडेच्या मंदिरात घुसल्याची घटना शनिवारी पहाटे धारवाड-पणजी महामार्गावरील चिंचेवाडीत (ता. खानापूर) घडली. या घटनेत सतीदेवी मंदिराचे छत जमीनदोस्त झाले असून कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना धारवाडमधील एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रामनगरकडून धारवाडच्या दिशेने निघालेली क्रेटा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारी असलेल्या कौलारु सतीदेवी मंदिरात घुसली. त्यामुळे,छप्पर कारवर कोसळून कारसह प्रवासी त्याखाली अडकले. लोकांनी कार व प्रवाशांना बाहेर काढले. हे प्रवासी केवळ सुदैवाने या अपघातातून बचावले.
लोंढा पोलिस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमींना धारवाडला हलविण्यात आले आहे. कारमध्ये सहा प्रवासी होते. त्यापैकी चौघांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये चालक शरणकुमार पी. सुगंधा चळवी, एक सात वर्षांची बालिका तसेच दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. सर्वजण गोव्यातून धारवाडमार्गे बंगळूरला जात होते.
#Belgaum #Khanapur #Accident #CarCrash #Temple #Injury #Emergency #RoadSafety #LocalNews #BelgaumNews #DevotionalPlace #TrafficAccident #Hospital #Rescue #CommunitySupport #SafetyFirst #RoadIncident #Devotees #PublicSafety #NewsUpdate
Belgaum Khanapur Accident CarCrash Temple
Belgaum Khanapur Accident CarCrash Temple
Belgaum Khanapur Accident CarCrash Temple