बेळगाव—belgavkar—belgaum : हलगा : आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा एकदा बायपासचे काम बंद पाडले. आवश्यक असलेली कागदपत्रे दाखविल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचे ठामपणे सांगत, शिवारातून बाहेर पडा; अन्यथा हिसका दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर शिवारातील मशीन व इतर साहित्य हटविण्यात आले.
येळ्ळूर रोडपासून बायपासच्या कामाला सुरुवात
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 20 दिवसांनंतर शनिवारपासून येळ्ळूर रोडपासून बायपासच्या कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी बायपासचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन काम बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
उच्च न्यायालयाने बायपासच्या कामावरील स्थगिती हटविली आहे, असे सांगत काही दिवसांपूर्वी हलगा शिवारातून बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेकदा कामाला विरोध करीत काम बंद न केल्यास रस्त्यावा उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Belgaum Halga Bypass work Yellur
Belgaum Halga Bypass work Yellur
Belgaum Halga Bypass work Yellur