बेळगाव—belgavkar—belgaum : तिने पहिले लग्न केले अन् नवर्याला सोडले. दुसरे लग्न करुन त्यालाही सोडले. यानंतर तिसर्या तरुणाला प्रियकर बनवून त्याच्याशी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली. परंतु, त्यालाही सोडून पुन्हा दुसर्या पतीकडे गेल्याने प्रियकर खवळला. त्याने महिलेच्या घरात जाऊन जाब विचारला. यातून भांडण होऊन त्याने प्रेयसीवर व प्रेयसीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघेही जखमी असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
चित्रपटाला शोभेल अशी ही घटना गोकाक येथे 27 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोकाक येथील एका महिलेने आधी संतोष बागेवाडी याच्याशी लग्न केले होते. यानंतर तिने मंजू कोळी (वय 38, रा. सिंगळापूर, ता. गोकाक) याच्याशी लग्न केले. काही वर्षे त्याच्याशी संसार करुन त्यालाही सोडून देऊन ती तीन मुलांसह भाडोत्री घर करून गोकामधील संगमनगर परिसरात राहते.
ती तीन मुलांसह गोकाक येथे एकटीच राहात असताना तिचा संपर्क आनंद कोप्पद (वय 31, रा. गोकाक) याच्याशी आला. यानंतर ती आनंदसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली. आनंद हा टॅक्सीचालक असल्याने तो बराचवेळ बंगळूरला केआरपूरम येथे राहायचा. परंतु, गोकाकला आला की तिला भेटण्यासाठी जात असे.
गेल्या काही दिवसांपासून सदर महिला आनंदचा फोन घेणे टाळत होती. त्यामुळे त्याचा संशय बळावला. त्याने माहिती काढली असता ती पुन्हा तिचा दुसरा पती मंजूच्या संपर्कात आल्याची माहिती त्याला मिळाली. 25 डिसेंबर रोजी तो गोकाकला आला. त्याने तिला सोबत घेऊन विविध ठिकाणी खरेदी केली. मुलांसह हॉटेलमध्ये जेवायलाही गेले. दुसर्या दिवशी 26 रोजी आपण बंगळूरला जातो, असे सांगून तो बाहेर पडला. परंतु, तो गोकाकमध्येच राहिला.
बंगळूरला गेल्याचे सांगत तो गोकाकमध्ये राहिल्याची कल्पना त्या महिलेला नव्हती. 27 रोजी सायंकाळी 5 पासून त्याने तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती फोन घेत नव्हती. त्यामुळे हातात चाकू घेऊन तो तिच्या घराकडे गेला. यावेळी बराच वेळ दरवाजा ठोठावला. परंतु, आतून प्रतिसाद आला नाही. त्याने जोरात दरवाजा धडकल्याने शोभा बाहेर आली. यावेळी तो तडक आत शिरला असता खोलीत मंजू असल्याचे दिसून आले.
तू माझ्यासोबत राहून पुन्हा दुसर्या पतीसोबत कशी काय राहतेस, असा जाब आनंदने तिला विचारला. यातून दोघांचे भांडण सुरू झाले. यावेळी आनंदने सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर वार केला. यावेळी त्याच्याच हातातील चाकू घेऊन तिनेही त्याच्यावर वार केला. त्यामुळे दोघेही जखमी झाले आहेत. सदर महिलेवर गोकाक येथे तर आनंदवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकाक पोलिसांत घटनेची नोंद झाली असून निरीक्षक सुरेशबाबू पवार तपास करत आहेत.
#Belgaum #Gokak #LoveTriangle #RelationshipDrama #LiveInRelationship #DomesticConflict #CrimeNews #KnifeAttack #PoliceReport #LocalNews #MurderMystery #DramaUnfolds #SocialIssues #FamilyDrama #WomenEmpowerment #UrbanLife #CommunitySafety #LegalIssues #EmotionalTurmoil #RealLifeDrama
Belgaum Gokak love triangle knife attack affair
Belgaum Gokak love triangle knife attack affair
Belgaum Gokak love triangle knife attack affair