बेळगाव—belgavkar—belgaum : ओढ्यावर बसविण्यात आलेले पंपसेट चोरल्यांच्या आरोपावरून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. गोकाक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
३० नोव्हेंबर रोजी दुपारी दुंडानट्टी येथील ओढ्याच्या काठावर बसविण्यात आलेले तीन शेतकऱ्यांचे ८६,५०० रुपये किमतीचे पंपसेट चोरल्याचे उघडकीस आले होते. यासंबंधी गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी चौघा जणांना अटक करून पंपसेट विक्रीतून आलेले ८६ हजार रुपये रोख रक्कम, चोरीसाठी वापरलेले चार लाख रुपये किमतीचे एक गुड्स वाहन व ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., उपनिरीक्षक किरण मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
#Belgaum #Belgavkar #CrimeNews #PoliceAction #Theft #Arrested #PumpSetTheft #GokakPolice #Investigation #FIR #LocalNews #CommunitySafety #LawEnforcement #JusticeServed #CrimeReport #SafetyFirst #BelgaumDistrict #PoliceRaid #StolenGoods #CrimePrevention
Belgaum Crime Police Action Theft Arrested Pumpset
Belgaum Crime Police Action Theft Arrested Pumpset