गेल्या 2 वर्षांपासून शिव-शंभू भक्तांची नाराजी आणि लोकार्पण
बेळगाव—belgavkar—belgaum : अनगोळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील शिवशंभू तीर्थ स्मारकाला बुधवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट दिली. स्मारकाचे उद्घाटन, प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा (5 जानेवारी) लवकरच होणार असल्याने पालकमंत्र्यांनी या परिसराची पाहणी करत काही सूचना मांडल्या.
संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी शिवप्रेमींकडून सहकार्य करण्यात येत आहे. तर अचानक निर्णय घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांसह शिव-शंभूभक्तांनी तारखेला विरोध केला आहे.
अनगोळ येथील रघुनाथ पेठ येथील रस्त्याचे भूमिपूजन करून पालकमंत्र्यांनी स्मारकाला भेट दिली. स्मारकाचे बांधकाम पाहून माहिती जाणून घेतली. लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहू, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेविका खुर्शीद मुल्ला, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Belgaum Angol Dharmaveer Sambhaji Maharaj Idol Dedication Ceremony
Belgaum Angol Dharmaveer Sambhaji Maharaj Idol Dedication Ceremony
Belgaum Angol Dharmaveer Sambhaji Maharaj Idol Dedication Ceremony