बेळगाव : होनग्याजवळ अपघातातील तरुणाचा मृत्यू

Belgaum Belgavkar
1 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : दोन महिन्यांपूर्वी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या काकतीवेस येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. मोहम्मद उमर माडीवाले (वय 10) रा. काकतीवेस असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

 

दि. 27 ऑक्टोबर 2024 रोजी संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱ्या भरधाव कारची डिव्हाईडरला धडक बसली होती. त्याचवेळी बेळगावहून संकेश्वरकडे जाणाऱ्या बसचालकानेही कारला चुकविण्यासाठी आपली बस सर्व्हिस रोडवर घेतली होती. त्यावेळी बसवरील नियंत्रण सुटून सर्व्हिस रोड शेजारील पान शॉप व वडापाव दुकानाला धडक बसली होती.

 

- Advertisement -

या अपघातात एकूण सात जण जखमी झाले होते. परिवहन मंडळाच्या बसचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या अपघातातील एका जखमीचा आधीच मृत्यू झाला होता. शनिवारी दुसऱ्या जखमीचाही मृत्यू झाला आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.

 

Belgaum accident Honaga NH4 Car Bus killed

Belgaum accident Honaga NH4 Car Bus killed

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *