Bangladesh News- बांगला देश हा आपल्या देशाचा शेजारी देश आहे. तिथे सध्या अराजगता पसरली असून प्रचंड हिंसाचार होत आहे. लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकार विरुद्ध आंदोलन करत होते आणि शेवटी शेख हसीना यांनी राजीनामा देऊन त्यांच्या बहिणीसह बांगला देशातून पलायन केले. त्यांनी भारतात शरण घेतली आहे. सध्या बांगला देशाचा ताबा तेथील लष्कराने घेतला असून सेना पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण बांगला देशात अराजकता का पसरली? तिथे सध्या स्थिती काय आहे? या सगळ्याची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.
काय आहे अराजकतेचे कारण? – Bangladesh News
बांगलादेशात (Bangladesh News) 1971 मध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शेख हसीना यांनी घेतला होता. त्यामुळे बांगला देशातील विद्यार्थी भडकले आणि त्यांनी या निर्णया विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांच्या मते मेरिटवर सरकारी नोकरी मिळायला हवी. याच दरम्यान बांगला देशातील सर्वोच्च न्यायालयाने जुलैमध्ये आरक्षणावर बंदी घातली होती तरी पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षणाची तशीच अंबल बजावणी केली आणि हा वाद चिघळून त्याचे रूपांतर हिंसक आंदोलनात झाले. या आंदोलनात बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला.
काय आहे 30 टक्के सरकारी नोकरीमध्ये मुक्ती योद्धे यांच्या आरक्षणचा इतिहास आणि विवाद?- Bangladesh News
1971 मध्ये पाकिस्तानमधून फुटून बांगलादेशाची (Bangladesh News) निर्मिती झाली होती. बांगला देशाच्या या स्वातंत्र्य युद्धात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वंग बंधू शेख मुजीबुर्रहमान यांना साथ दिली होती. त्यावेळी मुक्ती संग्रामात सामील झालेल्या नागरिकांवर पाकिस्तानी सैनिकांनी आनन्वित अत्याचार केले होते. या स्वातंत्र्य सैनिकांना बांगला देशात ‛मुक्ती योध्दे’ म्हणतात या मुक्ती योद्ध्यांच्या वारसदारांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांनी सरकारी नोकरीत 30 टक्के आरक्षण जाहीर केले होते.परंतु 1975 मध्ये एका लष्करी उठात राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांची हत्या झाली आणि त्यानंतर बांगला देशात अनेक वर्षे मार्शल लॉ लागू झाला. या काळात मुक्ती योद्ध्यांना देण्यात आलेल्या आरक्षणाचे काटेकोर पालन झाले नाही.काही वर्षानंतर मुक्ती योद्धांच्या या आरक्षणावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. हयात असेपर्यंत मुक्ती योद्ध्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणे समजण्यासारखे असले तरी त्यांच्या मृत्युपश्चात वारसदार (पत्नी, मुले, सून, नातू, पणतू) यांनाही सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण कायम ठेण्यात आले होते. आणि नेमके यावर अनेकांचा आक्षेप होता. दरम्यान, अनेक ठिकाणी स्वातंत्रसैनिकांचे वारसदार उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लिग पक्षाचे कार्यकर्ते स्वतः कोट्यातून नोकऱ्या मिळवतात, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.याच दरम्यान 2018मध्ये मुक्ती योध्दे आणि त्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरीमध्ये अरक्षणा विराधात उच्च न्यायल्यामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. आणि ती उच्च न्यायालयाने फेटाळली होती.कोर्टाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी वक्तव्य जारी केलं होतं. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांसाठी नोकऱ्यांमध्ये असलेलं आरक्षण यापुढेही चालूच ठेवण्याची ग्वाही हसीना यांनी दिली होती. पंतप्रधान शेख यांच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केलं, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणण आहे.
पंतप्रधान निवासस्थानावर आंदोलकांचा हल्ला – Bangladesh News
बांगला देशातील (Bangladesh News) परिस्थिती इतकी बिकट झाली की ढाकामधील पंतप्रधान निवासस्थावर आंदोलकांनी हल्ला केला. ढाका इथे हजारो विद्यार्थी आंदोलक पोहोचले आधी ही अनेक लोक तिथे उपस्थित होते. आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थावर हल्ला करून तिथे तोडफोड केली. दरम्यान बांगलादेशी पंतप्रधान शेख हसिना यांनी दुपारी तीन वाजता निवासस्थान सोडले. एका बांगला देशी वृत्तपत्राने सांगितले की शेख हसीना यांनी त्यांच्या बहिण रेहना यांच्याबरोबर एका छोट्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने देश सोडला.
बांगलादेशात लष्कर करणार नवीन सरकार स्थापन – Bangladesh News
लष्करप्रमुख वकार-उल-जमान म्हणाले की सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच अंतरिम सरकार स्थापन होईल. जनतेने लष्करावर विश्वास ठेवावा आणि शांतता राखावी.हिंसाचारात ज्या हत्या झाल्या त्यांची ही चौकशी होणार आहे.
पंतप्रधान शेख हसीना (आयर्न लेडी) यांनी घेतली भारतात शरण
बांगलादेशात (Bangladesh News) निर्माण झालेली अराजकता आणि हिंसाचार तसेच पंतप्रधान निवास स्थानावर झालेला हल्ला या सगळ्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन लष्कराच्या साहाय्याने एका छोट्या हेलिकॉप्टरमधून त्यांची बहीण रेहना यांच्या सह पलायन केलं. त्यांनी भारतात काही काळ शरण घेणार आहेत.
जळतोय बांगलादेश – Bangladesh News
आरक्षणाच्या मुद्यावरून लागोपाठ झालेली आंदोलने. या आंदोलनांनी घेतलेले हिंसक वळण, पंतप्रधान निवासस्थानावर झालेला हल्ला, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन केलेले पलायन आणि त्यातून निर्माण झालेली अराजकता. आत्तापर्यंत या सगळ्यात 300 बांगला देशी नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. तर तिथल्या हिंदू लोकांवर अत्याचार होत आहेत. बांगला देशी लष्कराने सध्या सूत्र हातात घेऊन पुन्हा सरकार स्थापन करण्याचे आणि देशाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पण सध्याची बांगलादेशातील (Bangladesh News) परिस्थिती मात्र बिकट आहे.