Awasari Budruk Electricity Board – सध्या पावसाचे दिवसही संपले आहेत तरी विद्युत पुरवठा आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये लाईट चा प्रोब्लेम व्हायला सुरुवात झाली आहे. त्याताचे आंबेगाव तालुक्यातील मोठे गाव अवसरी बुद्रुक या ठिकाणी तर वायरमनच नाही. तसे तर मोठे गाव असेल तर दोन वायरमन शिफ्ट नुसार असतात परंतु अवसरी बुद्रुक मध्ये एकही वायरमन नाही. दिवसतर लाईट चा खेळखंडोबा चालू आहेच परंतु जार रात्री अपरात्री लाईट गेली तर ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागते. यामुळे शिवसेना जिल्हा समन्वयक व ग्रामपंचायत सदस्य श्री. कल्याणराव हिंगे पाटील यांनी electricity Board च्या कार्यालयाला ठोकणार टाळे असा इशारा दिला आहे.
एक वायरमन रजेवर तर दुसरा बदली
अवसरी बुद्रुक या गावामध्ये गावठाण व इतर वाडी मिळून एकूण विद्युत वितरण कंपनीचे घरगुती २१०० तर कृषी पंपाचे ८०० ग्राहक आहेत. हिंगे यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी आमच्या गावामध्ये दोन वायरमन होते दोघांपैकी एक आजारी असल्यामुळे कामकाज पहात नाही तर दुसर्याची बदली झाली आहे. मागील एक महिन्यापासून गावाला वायार्मानच नाही.
अवसरी बुद्रुक बिबट्या प्रवण क्षेत्र
सध्या आंबेगाव मधील सर्वच गावे बिबट्या प्रवण क्षेत्र झाली आहेत. कधी मोतार्सायाकाल वर हल्ला होतो तर कधी कुणाला आपला जीव गमवावा लागतो. अवसरी मध्ये लाईट गेल्यास गावडेवाडी च्या वायरमन ला बोलवावे लागते. हिंगे असेही म्हणाले कि आम्ही यासंदर्भात एक महिन्यापूर्वीच अवसरी खुर्द येथील electricity Board च्या कार्यालयाशी लेखी पत्रव्यवहार केला आहे. परंतु electricity Board च्या कार्यालयातून कोणतीही दखल घेतलेली जात नाही यामुळेच श्री. कल्याणराव हिंगे पाटील यांनी इशारा दिला आहे कि ल्लावाकारात लवकर अवसरी बुद्रुक ला दोन कायम स्वरूपी वायरमन द्यावेत नाहीतर कार्यालयास टाळे ठोकले जातील.
electricity Board कार्यालयातून मिळाले हे उत्तर
अवसरी खुर्द येथील electricity Board येथील कनिष्ठ अभियंता बी.बी.शिंदे यांनी सांगितले आहे कि दोन वायरमन पैकी एकाची बदली झाली आहे आणि दुसरा वायरमन आजारी असल्यामुळे तात्पुरते तरी गावडेवाडी चा वायरमन च अवसरी बुद्रुक कचे कामकाज पाहिलं.