Anandacha Shida – शनिवारी पासून पूर्ण देशात मोठ्या आनंदात गणपती उत्सव चालू झाला आहे. सगळीकडे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यातच गणेश चतुर्थी चे मुहूर्त साधून सध्याच्या महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आचारसंहिते मुळे दोन तीन महीने आनंदाचा शिधा बंद करण्यात आला होता परंतु आता श्री गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटप करण्यात येणार आहे.
काय काय मिळणार आनंदाच्या शिधा मध्ये
महाराष्ट्र शासनाने जाहीर ही करून टाकले आहे की, अंत्योदय रेशन कार्ड धारकांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. आणि हा शिधा घेण्यासाठी १०० मोजावे लागणार आहेत. तसेच या वेळच्या आनंदाच्या शिधा (Anandacha Shida) मध्ये चार वस्तु मिळणार आहेत.
- चनाडाळ – १ किलो
- सोयाबीन तेल – १ लीटर
- साखर – १ किलो
- रवा – १ किलो
कुणाला मिळणार आनंदाचा शिधा (Anandacha Shida) चा लाभ
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने काही अटी लावल्या आहेत. हा आनंदाचा शिधा अंत्योदय रेशन कार्ड धारकांना त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना १०० रुपये भरून मिळणार आहे. आनंदाचा शिधा ला महाराष्ट्र सरकारची जाहिरात असणार आहे.

काय आहे आनंदाचा शिधा उपक्रम
महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना सणाला लाभ मिळवा या साठी महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केली आहे. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अश्या सणांच्या वेळेस अंत्योदय रेशन कार्ड धारकांना महाराष्ट्र शासनाकडून आनंदाचा शिधा (Anandacha Shida) वाटप केला जातो. तसेच आता गणपतीला ही आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. महाराष्ट्र शासनाला या शिधासाठी तब्बल ५६२ कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे.