सध्या फोर व्हीलर गाडी आपल्या जीवनाचा हिस्सा झाली आहे. प्रत्यक घरात एक कार हवी असते. प्रत्येकाला वाटते चारचाकी चालवावी परंतु पहिल्या सर्व गाड्या गिअर सहित यायच्या त्यामुळे काही लोकांना चालवायला अडचण व्हायची. नंतर महागड्या गाड्या आटोमेटिक (Automatic Car) यायला लागल्या पण त्या गाड्या सर्व सामान्यांना परवडणारी नव्हती. परंतु आता बजेट मधील चारचाकी गाड्या हि आटोमेटिक मध्ये आल्या आहेत. ह्या गाड्या घरातील स्त्रिया हि सहज चालवू शकतात आणि ट्राफिक मध्ये किंवा लांबचा प्रवास करताना पायहि दुखणार नाहीत. याच लिस्ट मधील ५ गाड्या आपण पाहणार आहोत ज्या सर्व सामान्य लोकांना घ्यायला परवडतील.
टाटा पंच TATA PUNCH
११९९ सी.सी. मध्ये TATA PUNCH हि गाडी पेट्रोल मध्ये उपलब्ध आहे. या गाडीमध्ये पेट्रोल मन्युअल, पेट्रोल आटोमेटीक, सी.एन.जी. मन्युअल आणि सी.एन.जी. आटोमेटीक अश्या चार ट्राजेक्शण मिळतात. टाटा पंच हि गाडी भारतातील मिनी एस.यु.व्ही. (SUV) म्हनुनही ओळखली जाते. एस.यु.व्ही. असूनही पेट्रोल आटोमेटीक मध्ये हि गाडीची ओनरोड किंमत रु. ७.६० फक्त आहे. सर्व व्हेरीएंट च्या विचार केला तर हि गाडी रु. ६.१३ पासून सुरु होऊन टाटा पंच चे टोप मोडेल रु. १०.२० ओनरोड मिळते. या गाडीचे मायलेज पेट्रोल आटोमेटीक मध्ये कंपनी क्लेम नुसार १८.८ प्रती कीलोमिटर इतके आहे. शिवाय हि गाडी ५ स्टार सेफ्टी रेटिंग (5 STAR SAFTY RATING) सहित येते. त्यामुळे बजेट जर ८ लाख पर्यंत असेल तर आटोमेटीक मध्ये सर्वात सेफ कार टाटा पंच हीच उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी अल्टो K10
सध्या भारतातील आटोमेटिक (Automatic Car) मध्ये सर्वात स्वस्त कार असेल तर ती म्हणजे अल्टो K10. हि गाडी पहिली गिअर मध्ये यायची परंतु मारुती सुझुकी कंपनीने २०२२ मध्ये या गाडीचे आटोमेटिक बाजारात लौन्च केले. या गाडीची किंमत एक्स शोरूम किंमत ५.५६ लाखांनी सुरु होते. हि गाडी १.० लिटर इंजीन सहित ६६ बी.एच.पी. पावर आणि ८९ एन.एम. टोर्क प्रदान करते. कंपनीने केलेल्या दाव्या नुसार हि गाडी २४.९० किमी/लिटर मायलेज देते. तसेच ड्रायव्हर आणि पेसेंजर च्या सेफ्टी साठी गाडीमध्ये 2 एअर बग्स दिल्या असून EBD आणि ABS सहित रिवर्स पार्किन सेन्सर हि देण्यात आला आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो (S-preso)
मारुती सुझुकी एस-प्रेसो ची किंमत अल्टो K10 पेक्षा थोडी जास्त आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत रुपये ५.७१ पासून सुरु होते. अल्टो K10 पेक्ष्या थोडी उंच असल्यामुळे गाडी मोठी वाटते. हि गाडीही अल्टो K10 सारखीच १.० लिटर इंजिन सहित येते आणि अल्टो K10 सारखेच EBD आणि ABS सहित रिवर्स पार्किन सेन्सर हि देण्यात आला आहे. फक्त एक सुविधा ज्यादा दिलेली आहे ती म्हणजे हिल होल्ड असीस्ट.
मारुती सुझुकी CELERIO
मारुती सुझुकी CELERIO हि गाडीही परवडणारी आणि कमी किमतीमध्ये आपल्याला मिळून जाते. गाडी मारुती सुझुकी एस-प्रेसो अजून थोडी मोठी आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत रुपये. ६.३३ लाखांपासून सुरु होते. त्याचप्रमाणे याही गाडीमध्ये मारुती सुझुकी एस-प्रेसो सारखेच १.० लिटर इंजिन आणि EBD आणि ABS हि देण्यात आला आहे. तसच या सर्व सुविधान्साहित की-लेस एन्ट्री, पावर मिरर, रिवर्स पार्किंग कॅमेरा, पुश बटन स्टार्ट, स्टीअरिंग माऊटेड कंट्रोल, अन्द्रोईड आटो , अप्पल कार प्ले, या सर्व सुविधा मिळतात. तसेच हि गाडी आपल्याला पेट्रोल मध्ये २६ किमी/लिटरचे मायलेज देते.
रेनोल्ट क्विड (kwid)
वरील तीनही गाड्या मारुती सुझुकी च्या आहेत त्यांचे मायलेज हि पेट्रोल ला चांगले आहे. परंतु क्विड हि गाडी मायलेज कमी म्हणजेच २२.३ किमी/लिटर एवढे देते. परंतु गाडी वरील तीनही गाड्या पेक्षा मजबूत आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत रुपये. ६.४१ लाख पासून सुरु होते. तसेच हि गाडी हि १.० लिटर पेट्रोल इंजिन सहित आटोमेटिक उपलब्ध आहे. या गाडीमध्ये फास्ट मोबाईल चार्जर हि दिला जातो.
मारुती सुझुकी Wagon-R
सी.एन.जी. मध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी आणि उंच गाडी म्हणून मारुती सुझुकी Wagan-R हि गाडी ग्राहकांची पहिली पसंती आहे. ग्राहक डोळे झाकून हि गाडी खरेदी करतो. हि गाडी आता कंपनीने आटोमेटिक (Automatic Car) मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या गाडीची एकस-शोरूम किंमत ६.४९ लाख पासून सुरु होते. १.० लिटर इंजिन सहित मारुती सुझुकी Wagan-R गाडी २५.१९ किमी/लिटर मायलेज देते. १.० लिटर इंजिन बरोबर अधिक पावर साठी हि गाडी १.२ लिटर मध्ये हि उपलब्ध आहे. या गाडीमध्ये ७ इंच टच स्क्रीन डिस्प्ले चार स्पीकर सहित मिळते. त्याचबरोबर हिल स्टोप असिस्ट, पार्किंग सेन्सर कॅमेरा, दोन एअर बग्स हि आहेत.
वरील मारुती सुझुकीच्या सर्व गाड्या आटोमेटिक (Automatic Car) सहित पेट्रोल आणि सी. एन. जी. (CNG) मधेही उपलब्ध आहेत.
2 thoughts on “आता आटोमेटिक कार (Automatic Car) तुम्हीही घेऊ शकता तेही बजेट मध्ये”