Maharashtra Band News: बदलापूर मध्ये झालेल्या चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणा विरुद्ध महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण या बंदला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचं म्हणले आहे.त्यामुळे महाविकास आघाडी शांततेत आंदोलन करणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवन चौकात आंदोलनाला बसणार आहेत. याबाबतीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली असून आंदोलनाची दिशा काय असेल आणि हे आंदोलन वेळ चालणार आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं.
काय आहे उच्च न्यायालयाचा आदेश? (Maharashtra Band )
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी बदलापुरमधील चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंग अत्याचाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी होणारा महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर जे बंद करतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
त्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवत जे कोणी बंद करतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. त्यानंतर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की ते उद्या म्हणजे 24 ऑगस्टला होणारा महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) मागे घेत आहेत पण राज्यभर काळ्या फिती लावत आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की बंद आम्ही उद्या जाहीर केला होता.पवारसाहेब आणि पटोदे बाहेर आहेत त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही.फोनवर बोलणे झाले. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे.पुन्हा सांगतो,कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण आम्ही बंद करणार नाही. आंदोलन करूनच स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आंदोल करायचे नाही? तेही महिलांविरोधातील अत्याचाराविरोधात आंदोलन करायचे नाही. हे काही पटत नाही.गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते, कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही तोंडच बंद करू. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? मोर्चे हडताळ यावर बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त करू नयेत का? यावर घटनातज्ज्ञांनी बोलायला हवे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Band – कसे करणार आंदोलन?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की ते शिवसेना भवना जवळ बसणार आहेत. ते तोंडाला काळी पट्टी बांधून दोन तास आंदोलन करणार आहेत. पुढे ते म्हणाले की माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं. तेंव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते आपण पाहिले आहे. आपल्या देशात तसे काही घडू नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचे आंदोलन थांबणार नाही.गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते, कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही तोंडच बंद करू.
बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असते ते दाखवेल अशी आशा आहे.काल कोर्टाने जे थोबडवलं ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का? आताही मी कौतुक करत आहे.न्यायालय हे तत्परतेने हलू शकते. तीच तत्परता त्यांनी मी ज्या कारणाने महाराष्ट्र बंदचे आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे. सरकार नराधमांना पाठीशी घालत आहे. उस्फुर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवत आहे. ते स्वतःच्या विश्वात मश्गुल आहेत.त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि लोकांना जागरूक करणार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सदावार्तेनवर साधला निशाण
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदावर्तेनवर निशाला साधला ते म्हणाले याचिका कर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई, बहिणींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात.मागे मराठा आरक्षणाच्या विरोधात देखील ते गेले होते. असे बोलून उद्धव ठाकरेंनी सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेला लैगिंक अत्याचार उघडकीस आला आणि सगळा महाराष्ट्र हादरून गेला. बदलापूरकरांनी नराधमाला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत आंदोल केले! काही तास रेल रोको झाले. पुढे गुन्हेगाराला अटक झाली आहे त्याला योग्यती शिक्षा होईल अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली असली तरी महाविकास आघाडी तर्फे 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात या बंद विरुद्ध याचिका दाखल केली आणि कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या आंदोलन कसे होणार याबद्दल सांगितलं आहे.