Ather Rizta News – सध्या रोजच आपण तापमान वाढीच्या बातम्या वाचतो आणि ते अनुभवतो देखील. सतत होणारे प्रदूषण, जंगलतोड यामुळे यात आणखी वाढ होऊन निसर्ग चक्रात बाधा येत आहे. वेळोवेळी तज्ज्ञांकडून तापमान वाढीचा काय काय परिमाण होत आहे याचा तपशील दिला जातो आणि त्यासाठी काय उपाय योजना करणे गरजेचे आहे हेही सांगितले जाते.
त्यातच भरीस भर म्हणून पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पेट्रोल, डिझेल ही इंधने मर्यादित प्रमाणात आहेत हे तर सर्वांनाच माहित आहे. यासाठी उपाय म्हणून सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे अमर्यादित ऊर्जेचे स्त्रोत वापरण्यावर जास्त भर दिला जात आहे. गाड्यांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर सौर उर्जेवर चालणाऱ्या गाड्यांसोबत आता बाजारात चार्जिंगच्या म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्या देखील येऊ लागल्या आहेत.
वाढत जाणारे इंधनाचे भाव, प्रदूषण हे पाहता आता लोकंही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. कंपन्या देखील या सगळ्याचा विचार करून जितक्या सोयी देता येईल तितक्या देऊन या इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करत आहेत. भविष्यात येणारा काळ हा इलेक्ट्रिक गाड्यांचा असेल आणि म्हणूनच कंपन्या या गाडीच्या निर्मितीवर भर देत आहेत. अशीच Ather ही एक इलेक्ट्रिक गाड्या निर्मिती करणारी नावाजलेली कंपनी आहे आणि या कंपनीने नवीन स्कूटर बाजारात आणली आहे. चला तर मग बघूया या स्कूटरची संपूर्ण माहिती.
Ather ही एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीने इलेक्ट्रिक two wheeler क्षेत्रात सगळ्यात आधी पाय रोवले. Ather ने या आधी काढलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन माणसेही नीट बसू शकत नव्हती. त्याची सीट लहान असल्याने ही समस्या होती शिवाय लेग स्पेस आणि लगेज स्पेस देखील कमी होती म्हणूनच लोक TVS, ओला अश्या कंपन्यांकडे वळत होते. पण आता Ather ने त्या जुन्या डिझाईनमध्ये बदल करून ही नवी फॅमिली स्कूटर बाजारात आणली आहे. हे नवे Ather चे मॉडेल एका कुटुंबासाठी परिपूर्ण असेल असे सांगण्यात येत आहे. या मॉडेलचे नाव Ather Rizzta असे आहे. ही गाडी दिसताना अगदी TVS iQube सारखी दिसते.
काय आहेत Ather Rizta चे फीचर्स?
- ही गाडी दोन बॅटरी पर्यायांसह आली आहे. यातील पहिला बॅटरी पर्याय म्हणजे २.९ kwh आणि दुसरा बॅटरी पर्याय म्हणजे ३.७ kwh असा आहे.
- २.९ kwh पर्यायात १०५ किमीची रेंज मिळते तर ३.७ kwh बॅटरी पर्यायात १२५ किमी पर्यंतची रेंज मिळते.
- दोन्ही पर्यायातील बॅटरीला IP67 चे प्रमाणपत्र आहे. म्हणजेच या बॅटरी पाणी आणि धुळीपासून संरक्षण देतात.
- यात दोन रायडिंग मोड उपलब्ध आहेत. पहिला मोड म्हणजे झिप (zip) हा मोड चांगल्या परफॉर्मन्ससाठी आहे. दुसरा मोड म्हणजे स्मार्टइको (SmartEco) हा मोड चांगली रेंज देतो.
- यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देखील मिळते.
कसे आहे Ather Rizta चे डिझाईन?
Ather 450 आणि Ather 450 X चे डिझाईन चांगले आहे पण Ather Rizzta चे डिझाईन खूप बॉक्सी देण्यात आले आहे. Ather Rizzta मध्ये चौकोनी आकाराचे LED हेडलाईट पाहायला मिळतील. याचे साईड इंडिकेटर्स देखील हेडलाईटलाच जोडलेले आहेत. समोरून पाहिल्यावर ही गाडी एकदम TVS iQube सारखीच दिसते. या गाडीची सीट लांबीला जास्त देण्यात आली आहे. यामुळे यावर दोन माणसे अगदी सहज आणि आरामात बसू शकतात. गाडीच्या सीट खाली USB चार्जर देखील देण्यात आला आहे.
- Ather Rizta गाडीचे वजन किती आहे?
Ather Rizta चे वजन सुमारे ११९ किलो आहे. - Ather Rizta गाडीत किती storage मिळते?
यात एकूण ५६ लिटर storage मिळते. - Rizta गाडीचा वेग किती आहे?
या गाडीचा टॉप स्पीड ८० km/hr असा आहे. तर ० – ४० kmph चा वेग ही गाडी ३.७ सेकंदात पकडते. - Ather Rizta कोणकोणत्या गाड्यांशी स्पर्धा करते?
ही family scooter बजाज, ओला S1 Pro, TVS iQube या गाड्यांसोबत स्पर्धा करते. - Ather Rizta ची किंमत काय आहे?
या गाडीची किंमत एक लाख दहा हजार रुपयांपासून आहे. - Ather Rizta किती रंगात उपलब्ध आहे?
ही गाडी सात रंगात उपलब्ध आहे. Siachen White Mono, Deccan Grey Mono, Pangong Blue Mono, Alphonso Yellow Duo, Deccan Grey Duo, Cardomom Green Duo, Pangong Blue Duo हे सात रंगाचे पर्याय यात पाहायला मिळतील.
FAQ:-
Ather ही चिनी कंपनी आहे का?
नाही. Ather ही भारतीय कंपनी असून बँगलोरमध्ये यांचे हेडक्वार्टर आहे.
Ather गाडीच्या बॅटरीची वॉरंटी किती आहे?
या गाडीच्या बॅटरीची वॉरंटी ५ वर्षे आहे.
Ather कंपनीचा मालक कोण आहे?
तरुण मेहता हे ather company चे मालक आहेत.
Ather गाडीची बॅटरी लाईफ किती आहे?
या गाडीची बॅटरी लाईफ १००००० km आहे.
1 thought on “संपूर्ण कुटुंबासाठी Ather ची Ather Rizta ही गाडी ठरेल उत्तम पर्याय”