शेवटी आसाम सरकारचा मोठा निर्णय – लव्ह जिहाद (Love Jihad) संबंधी प्रकरणात जन्मठेपेचा कायदा

Admin
3 Min Read
sakaltime.com

आसाम मधील भाजप प्रदेश कार्यकारिणी ची बैठक झाली त्या बैठकीत हिमता बिस्वा सरमा यांनी बोलताना सांगितले की, की आम्ही लवकरच लव्ह जिहाद (Love Jihad) मधील आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा होईल असा कायदा आणणार आहोत. ते असेही म्हणाले की आम्ही निवडणुकी पूर्वी आश्वासन दिले होते की, लवकरच आम्ही लव्ह जिहाद बद्दल ठोस निर्णय घेणार आहोत. ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे.

भारतात सर्व राज्यांमध्ये दररोज अश्या हजारो बातम्या ऐकायला मिळतात, लव्ह जिहाद (Love Jihad ) मध्ये प्रीयसिला जाळून मारले आरोपी फरार, प्रियसि वर असिड हल्ला. हे प्रमाण खूपच वाढत चालले आहे.

आसाम राज्यामध्ये जमीन खरेदी विक्री चा हि मोठा निर्णय

आसाम चे मुख्यमंत्री श्री. सरमा असेही म्हणाले की, आसाम मध्ये लवकरच एक असे धोरण आणणार आहे ज्यांअतर्गत केवळ आसाम राज्यामध्ये जन्मले लोकच राज्य सरकारी नोकरी साठी पत्र ठरतील- हे एक अधिवासी धोरण असल्यामुळे आमच्या निवडणुकी मध्ये दिलेल्या आश्वासानानुसार एक लाख राज्य सरकारी नोकर्यांमध्ये अधिवासिना प्राधान्य मिळेल. तसेच हिंदू – मुस्लीम मधील जमीन विक्रीचे व्यवहार थांबता आले नाही तरी त्याची प्रत्येक वेळेस सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.

युपी मध्ये लव्ह जिहाद (Love Jihad) विधेयक मंजूर

युपी म्हणजेच उत्तर प्रदेश मध्ये संपूर्ण भाजप सरकार आहे. आणि तेथील योगी आदित्यनाथ हे पहिल्यापासून लव्ह जिहाद विरोधी आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात हे विधेयक विधानसभेत मांडले होते आणि मंजूरही केले आहे. या विधेयकात लव्ह जिहाद मधील आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा करण्यात आली आहे आणि सर्व कायद्यांमध्ये शिक्षा हि दुप्पट करण्यात आली आहे. जेणेकरून गुन्हा करायला गुन्हेगार दहा वेळा विचार करेल.

- Advertisement -

नवी मुंबई मधील लव्ह जिहाद (Love Jihad ) प्रकरण

सध्या नवीनच नवी मुंबई मध्ये एका तरुणीचा मुस्लीम तरुणाने खून केला आहे. हेही एक लव्ह जिहाद प्रकरण आहे असे समोर आले आहे. मुलीचे नाव यशश्री शिंदे आहे. मुख्य आरोपी दाउदि शेख याने तिची हत्या केली आहे. त्याला पोलिसांनी कर्नाटक मधील गुलबर्गा येथून अटक केली आहे आणि त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.  

हे हि वाचा – असा एक मराठी माणूस ज्याने जगातील सर्वाधिक शिक्षण घेतले आहे, श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR) यांच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?

मुख्य आरोपी दाउदि शेख याला अटक केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आणि का मारले हे हि सांगितले. त्याच्या सांगण्यावरून यशश्री आणि त्याची ३ ते ४वर्ष मैत्री होती कारण ते दोघेही एकाच परिसरात रहात होते. हे घरच्यांना कळल्यावर त्याच्या विरोधात पोलीस ठाणे मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि काही दिवसांनी तो सुटला . सुटल्यावर दोघेही एका ठिकाणी भेटले , तिथे त्याने तिला लग्नाची अट घातली परंतु तिने नकार दिला. आणि याचमुळे त्याने तिची  चाकू भोकसून हत्या केली

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *