काल बिग बॉस मराठीच्या घरात गहजब घडला आहे. तोंडाळ आणि भांडकुदळ Nikki Tamboli च्या श्रीमुखात आर्याने एक वाजवून दिली. बिग बॉस मराठीच्या घरात टास्क खेळत असताना कायम भांडणे आणि वादावादी तर होतच असते.आणि या सिझनमध्ये देखील भांडणे आणि वादावादी होतच आहे.गुरुवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन निवडण्याचा टास्क दरम्यान निक्की तांबोळी आणि आर्या जाधवमध्ये वादावादी झाली आणि जोरात राडा झाला. आणि या भांडणाचे पर्यावसान आर्याने निक्किच्या थोबाडीत मारण्यात झाले आहे.एका बाजूला आर्याने निक्किच्या कानशिलात मारून बिग बॉसच्या घराचा नियम मोडला आहे पण दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनी आर्याचे कौतुक केले आहे.
कोणी तरी Nikki Tamboli ला धडा शिवायला हवा होता
नेटकऱ्यांनी Nikki Tamboli ला आर्याने मारले त्यामुळे आनंदच व्यक्त केला आहे. Nikki Tamboli सारख्या बाईला कोणीतरी धडा शिकवणे गरजेचे होते असे नेटकरी म्हणत आहेत तर आर्याचे कौतुक होत आहे. जर आर्याला घराबाहेर काढले तर आम्ही बिग बॉस पहायचे बंद करू अशा प्रकारचा सूर प्रेक्षकांमधून येत आहे.बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पाडत होता. या टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण झालं. आर्या आणि निक्कीमध्ये वाद होण्या आधी निक्कीने अंकिता प्रभु-वालावलकर आणि पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांना टास्क दरम्यान धमकी दिली होती. अंकिता आणि निक्कीमध्ये बरीच झटापट देखील झाली. तर Nikki Tamboli ने टास्कमधील जादुई हिरा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. पण तिची डाळ कोणीच शिजू दिली नव्हती त्यामुळे निक्की भयंकर चिडलेली होती.
काय घडले नेमकं?
नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कमध्ये नेहमीप्रमाणे Nikki Tamboli आणि अरबाजची दादागिरी दिसून आली. अरबाज पुन्हा जान्हवी आणि डीपी (धनंजय पोवार) यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच दरम्यान निक्कीने अंकिता, वर्षा आणि पॅडी म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात तिला यश मिळाले नाही त्यामुळे ती आधीच हताश झाली होती आणि वैतागली देखील होती. पण या फेरीत जान्हवीने जादुई हिरा मिळवला आणि अरबाज पटेल याला कॅप्टन होण्याच्या शर्यतीतुन बाद केले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत जादुई हिरा मिळवण्यात वैभवला यश मिळाले आणि त्याने सूरजला कॅप्टन होण्याच्या शर्यतीतुन बाद केले.
तिसऱ्या फेरीत आर्या, वर्षा, जान्हवी बाथरूम एरियात जादुई हिरा प्रोटेक्ट करत होत्या. आर्याने बाथरूम एरियाचे दार दाबून धरले आणि निक्कीला आत येण्यापासून रोखले. निक्कीने प्रयत्न केले पण तिला आर्याला ढकलून आत येता आले नाही. पॅडी(पंढरीनाथ कांबळे) आणि अंकिताला उचलून फेकण्याची धमकी देणारी निक्कीबाई अरबाजकडे मदतीसाठी धावत गेली. आणि अरबाज पटेलने बाथरूम एरियाचे दार त्याच्या ताकतीच्या बळावर उघडून दिले. निक्की आणि आर्यामध्ये झटापट सुरू झाली यातच आर्याने निक्कीला श्रीमुखात भडकावून दिली. आणि निक्कीने कांगावा सुरू केला. तिने बिग बॉसला सांगितले की “आर्याने मला मारले… मी हे सहन करू शकत नाही.”
बिग बॉसने देखील आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला बिग बॉस काय शिक्षा देणार हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळेल.
प्रेक्षकांनी दिला Aarya Jadhao ला पाठींबा
बिग बॉसच्या घरात मारहाणीला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. बिग बॉसकडूनही आर्याचा निषेध करण्यात आला. पण दुसरीकडे नेटकाऱ्यांनी आर्याला पाठींबा दर्शवला आहे. शिक्षा म्हणून जर Aarya Jadhao ला बाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणे बंद करणार असल्याचे म्हंटले. एका युजरने आर्याने Nikki Tamboli ला मारल्याने मन सुखावलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर,आर्याने आज खरोखरच अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला खुश केलं असल्याने एका युजरने म्हणले. जर आर्याला शिक्षा झाली तर अरबाजला देखील शिक्षा झाली पाहिजे. त्याने अभिजितलाही धक्काबुक्की केली आहे. आर्याला देखील अजबाजने ढकलून दिले होते. तर, आणखीन एकाने म्हणले, आर्याने जे काय केलं ते चांगलंच केलं. जाळ आन धूर संगट काढला. नाद खुळा मराठमोळी आर्या….तर,बिग बॉसला आर्याने मारलेले दिसलं मग अरबाजने अभिजीत दादाची कॉलर पकडून ढकलून दिले ते तेंव्हा नाही दिसलं का असा थेट सवालच केला आहे. अरबाज,निक्की एवढ्या वेळा धक्का बुक्की करतात तर आर्याला बाहेर काढले तर बिग बॉस मराठी पक्षपाती आहेत असे आम्ही समजू असेही एका युजरने म्हणले आहे. तर, आर्याचे वागणे चुकीचे आहे, तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे असा ही काही लोकांचा सूर पहायला मिळत आहे.
खरं तर निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची दादागिरी पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत. सतत निक्कीचे ते कर्ण कर्कश्य आवाजात ओरडून ओरडून भांडणे म्हणजे प्रेक्षकांसाठी डोकेदुखी झाली आहे. मनोरंजन कमी भांडणे आणि कर्कश्यपणा जास्त असं चित्र बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षक निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल वर चिडून आहेत. त्यात आर्याला बिग बॉसने कठोर शिक्षा केली तर प्रेक्षकांचा रोष आणखीन वाढणार आहे. असेच सुरू राहील तर प्रेक्षक बिग बॉस शोकडे पाठ फिरवणार हे मात्र निश्चित आहे.
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बिग बॉस आर्याला काय शिक्षा देणार हे पाहण्यासारखे आहे.