तरुणपनी काय करत होते, उपोषण किंग अण्णा हजारे, प्रेरणादायी जीवनप्रवास – Anna Hazare’s inspiring life journey

Admin
5 Min Read
Anna Hazare

अण्णा हजारे (Anna Hazare’s inspiring life journey) यांना सर्वजण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच ओळखतात. त्यांनी ग्रामीण भागातील विकास व्हावा यासाठी आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी अनेक उपोषणे केली. अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव अण्णा हजारे नसून, किसन बाबुराव हजारे हे आहे. त्यांचा जन्म १५ जून १९३८ साली अहमदनगर (Ahemednagar) जिल्यातील भिंगार या छोट्याश्या गावी झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेले अण्णा यांना लहानपणापासूनच देशभक्तीची आवड होती, १९६३ मध्ये ते ड्राईव्हर या पदावर सैन्य दलात (Army) भरती झाले.

अण्णा हजारे (Anna Hazare) यांचे सामाजिक कार्य

भिंगार या गावी जन्म झालेले अण्णा अहमदनगर जिल्यातीलच राळेगणसिद्धी (Ralegansiddhi) या ठिकाणी लहानाचे मोठे झाले आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आता राळेगणसिद्धी हे अण्णा हजारेंचे गाव म्हणूनच ओळखले जाते. त्यांचे जन्म गाव आणि राळेगणसिद्धी मधील अंतर अंदाजे ५० किलीमिटर आहे. असंख्य चळवळीचे संघटन आणि प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त त्यांनी असंख्य उपोषणे केली आहेत. १९९१ मध्ये महाराष्ट्रातील फेडरल स्तरावरील भ्रष्टाचार च्या समस्येकडे लक्ष दिले. त्यांनी ग्रामीण भागातील भ्रष्टाचार आवाक्यात यावा यासाठी “पीपल्स मोमेंट अगेन्स्ट करप्शन” ची स्थापना केली. भ्रष्ट अधिकारी निलंबित करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचे अण्णा च्या लक्षात आल्यावर त्यांनी उपोषण केले, अखेरीस अण्णा हजारेंनी उपोषण करून सरकारला शेकडो भ्रष्ट अधिकारी निलंबित करण्यास प्रेरित केले.

माहितीचा अधिकार कायदा आमलात आणला

सरकारी अधिकारी यांचा भ्रष्टाचार वाढतच आहे हे अण्णा हजारे (Anna Hazare)  यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी “माहितीचा अधिकार” कायदा आणण्यासाठी सरकार ला प्रेरित केले. १९९७ सालापासून अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात “माहितीचा अधिकार” (Right to Information) साठी प्रचार करण्यास सुरुवात केली. या कायद्याद्वारे सामान्य नागरिक सरकारच्या कामकाजाबद्दल आणि सरकारी अधिकारी यांच्या कार्याबद्दल माहिती मागवू शकतो. पाच ते सहा वर्ष आणा हजारे आणि त्यांचे साथीदार यांनी “ माहितीचा अधिकार” बद्दल समाजात जनजागृती केली. इतके वर्ष वाट पाहून सुद्धा कायदा आमलात येत नाही ये अण्णा च्या लक्षात आल्यावर २००३ मध्ये त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. अण्णा ची तब्येत खालावल्यावर अखेर बारा दिवसांनी कायद्याचा मसुदा तयार करून २००५ मध्ये का कायदा संसदेत मंजूर करण्यात आला.  

राळेगणसिद्धी मधील गुन्हेगारी आणि गरिबी संपवली

सैन्यदलातून रिटायर झाल्यावर ते पुन्हा आपल्या गावी राळेगणसिद्धी येथे आले. परंतु त्यांनी पहिले कि राळेगणसिद्धी मध्ये लोकांची परिस्थिती खूप बिकट होती. इथे गुन्हेगारी वाढली होती. गरिबी आणि दुष्काळ याने नागरिकांचे कंबरडे मोडले होते. अण्णा हजारे (Anna Hazare)  यांनी प्रथम या गावात ग्रामीण विकास प्रकल्प सुरु केला. सर्व नागरिकांना सोबत घेऊन गावात जलसंधारण कार्यक्रम सुरु केला, आणि जमीन वनीकरण केले यामुळे गावात पाण्याची मोठी समस्या दूर झाली.  गावात शेतजमीन वाढवण्यासाठी लोकांना सोबत घेवून कृषी सुधारणा केल्या. काही दिवसांनी राळेगणसिद्धी हे गाव धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाले. अण्णांनी श्रम दान योजनेतून गावामध्ये रहिवाशी शाळा, मंदिरे आणि अनेक इमारती बांधल्या. तसेच लोक एकत्रित यावेत आणि गावात सुधारणा व्हाव्यात यासाठी त्यांनी अनेक समाजकल्याण प्रकल्प आणि सहकारी संस्था स्थापन केल्या. गावाचा विकास पाहून सरकारी अधिकाऱ्यांनी हाच नमुना घेऊन अनेक गावांचा विकास केला.

- Advertisement -

लोकपाल विधेयक (Lokpal Bill) हि केले पास

माहितीचा अधिकार कायदा मान्य झाल्यावर अण्णा हजारे गप्प बसले नाही. भ्रष्टाचार विरोधी लढा पुढे चालूच ठेवला आणि लोकपाल विधेयक आणायचे असे ठरवले. लोकपाल विधेयक मध्ये  पंतप्रधान पासून वरिष्ठ अधिकारी आणि सर्व सरकारी कर्मचारी यांची भ्रष्टाचार विरोधी चौकशी करता येईल आणि प्रत्येक राज्यात भ्रष्टाचार विरोधी एक युनिट स्थापन करावे या प्रमुख मागण्या होत्या. २०१० मध्ये सरकार ने लोकपाल विधेयक पास तर केले परंतु त्याला काहीही  अधिकार दिले नाही. यामुळे  मध्ये  अण्णा हजारे (Anna Hazare)  यांनी उपोषण चालू केले परंतु त्यांना अटक करून सांगण्यात आले की ३ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण करता येणार नाही. काही वाटाघाटी झाल्यावर उपोषणाचा कालावधी १५ दिवसाचा करण्यात आला, मग त्यांनी २०११ मध्ये दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर उपोषण चालू केले आणि सरकार ने लोकपाल विधेयक काही अट मान्य करून पास केले.

अरविंद केजीरवाल (Arvind Kejirval) यांचाही मोलाचा वाटा

अण्णा हजारे ज्या वेळेस लोकपाल विधेयक साठी २०११ मध्ये दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर  उपोषणाला बसले तेव्हा अरविंद केजीरवाल (Arvind Kejirval) हेहि दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णा हजारे सोबत उपोषणाला बसले होते.  अरविंद केजीरवाल यांनी लोकपाल कायद्या साठी “इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप”  ची स्थापना केली. अण्णांच्या या आंदोलनात खूप जणांनी त्यांना साथ दिली. त्यातील महत्वाची नावे म्हणजे अरविंद केजीरवाल, कुमार विश्वास (Kumar Vishvas), मनीष सिसोदिया (Manoj Sisodiya) आणि किरण बेदी (Kiran Bedi) हे आहेत. अरविंद केजीरवाल सध्या “आम आदमी पार्टी” (AAP) चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.  

For Anna Hazare 4400+ HD photos Click hear

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *