वडिलांच्या अटीपायी अमिताब बच्चन यांनी केले होते पहिल्या प्रेमाला टाटा बाय बाय – Amitabh Bachchan Love Story

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Amitabh Bachchan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amitabh Bachchan Love Story : एका प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘दो अंजाने’ मध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकत्रित काम केले. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. त्यानंतर ‘गंगा कि सौगंध’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका को-स्टार ने रेखा संगे बत्तमिजी केली होती तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला मारहाण केली होती. अमिताभ बच्चन वरून रेखा आणि जया यांचे अधिक वेळा भांडणही झाले. दोघांच्या प्रेमसंबंध बद्दल दोघांनाही खूप वेळा मुलाखती मध्ये विचारण्यात आले, परंतु दोघेही शेवटपर्यंत काहीच नाही बोलली. शेवटी वडिलांच्या अतिपुढे अमिताभ बच्चन यांना हार मानवी लागली आणि त्यांचे लग्न रेखा यांच्याशी न होता जया यांच्याशी झाले.

अमिताभ बच्चन हे नाव अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसाच्या परियाचे आहे. भारतात एकही जण असा नसेल ज्याला बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन माहित नसतील. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबादमध्ये १९४२ मध्ये झाला. हरिवंशराय बच्चन या एका प्रसिद्ध हिंदी कवींच्या घरी अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला.

अमिताभ बच्चन यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरेच पुरस्कार पटकावले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एकूण १६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, त्यांची अभिनय शैली आणि पात्रात जिवंतपणा आणण्याचे कसब या यशामागचे खरे रहस्य आहे.

Amitabh Bachchan यांना बनायचे होते इंजिनियर

Amitabh Bachchan आज लोकप्रिय अभिनेते असले तरीही त्यांना इंजिनियर व्हायचे होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण शेरवूड कॉलेज नैनीताल येथे झाले तर नंतरचे पुढील शिक्षण त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या केरोरी महाविद्यालय घेतले. त्यांच्या मनात इंजिनिअर होण्याचे होते परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते आणि ते अभिनय क्षेत्रात आले. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात.

१९६९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सात हिंदुस्थानी या चित्रपटातून त्यांचे यात पदार्पण झाले. आज ते बॉलीवूडचे सुपरस्टार असले तरीही यामागे त्यांची खूप मेहनत आहे. त्यांनी अनेक नकार पचवत यात तग धरला. सुरुवातीला त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले. त्याचप्रमाणे ऑल इंडिया रेडिओ साठी त्यांनी ऑडिशन दिले होते पण जड आवाजामुळे त्यांना नकार मिळाला. यात खचून न जाता त्यांनी २००० मध्ये छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपती या शो द्वारे पदार्पण केले.

अमिताभ बच्चन आणि रेखा – Amitabh Bachchan Love Story

१९८१ साली Amitabh Bachchan, Rekha आणि जया यांचा मल्टी स्टार चित्रपट रिलीज झाला. सिलसिला या यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात शशी कपूर आणि संजीव कुमार यांच्याही भूमिका आहेत. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट होता. यात रेखा, जया आणि अमिताभ बच्चन यांच्या कथित वास्तवातील त्रिकोणी प्रेमकहाणी होती. सिलसिला या चित्रपटानंतर रेखा आणि Amitabh Bachchan यांनी पुन्हा कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही. सिलसिला या चित्रपटाने या लोकप्रिय जोडीचा अंत केला आणि त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या अफवांचा अंत झाला.

आता पुन्हा या प्रेमाचा सिलसिला सुरु होण्याचे कारण म्हणजे आता टीव्ही सिरियलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. संदीप सिकंद या प्रसिद्ध निर्मात्यांनी या टीव्ही सिरियलची तयारी सुरू केली आहे. या कथेत एक नवीन कथाही जोडली जाणार असून त्यांनी अमिताभ आणि रेखा यांची भूमिका साकारण्यासाठी कलाकारांची निवड देखील केली आहे.

ही भूमिका साकारण्यासाठी निर्माता संदीप सिकंद यांनी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची निवड केली आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदा ससुराल सिमर का या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या दोघांच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्री चे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. याच शो दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाह बंधनात अडकले. सध्या हे जोडपे त्यांचा मुलगा रुहान याच्या सोबत वेळ घालवत आहेत. दीपिका ही सध्या आपल्या मुलाच्या संगोपनात व्यस्त असल्याने तिने ब्रेक घेतला आहे पण निर्माता संदीप सिकंद यांच्या ऑफर नंतर हे दोघे पुन्हा टीव्हीवर झळकू शकतात.

कसे अडकले अमिताभ आणि जया लग्न बंधनात?

जया आणि अमिताभ बच्चन यांचा विवाह ३ जून १९८३ रोजी झाला. जया यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९६३ मध्ये महानगर या बंगाली चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा एका सहाय्यक अभिनेत्रीचे काम केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. गुड्डी या चित्रपटाच्या सेटवर Amitabh Bachchan आणि Jaya यांच्या भेट झाली.

या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. अमिताभ हे राजेश खन्ना आणि जया बावर्ची या चित्रपटात एकत्र काम करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर भेटायला जात त्यामुळे त्या दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले.

अमिताभ यांच्या वडिलांची काय अट होती?

जंजीर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अमिताभ आणि त्यांचा सर्व मित्र परिवार लंडनला फिरायला जाणार होता यात जया देखील होत्या. मात्र अमिताभ यांच्या वडिलांनी त्यांना एक अट घातली.

Amitabh Bachchan यांचे वडील हरीवन्शाय बच्चन यांना जेव्हा समजले अमिताभ यांच्या मित्र परिवारात जया देखील आहेत तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले; जर तुम्हाला एकत्र लंडनला जायचे असेल तर आधी लग्न करावे लागेल. याच कारणाने अमिताभ आणि जया यांनी लंडनला जायच्या आधी घाईत लग्न केले. हा दिवस लंडनला जाण्याचाच होता. आपल्या वडिलांच्या अटीमुळे त्यांनी ३ जून रोजी घाईतच लग्न केले आणि थेट हनिमूनसाठी लंडनला गेले.


Faq

What is Amitabh Bachchan’s real name?

Originally named Inquilab Shrivastava,

Is Rekha married to Amitabh?

Yet, this much-talked about love story always remained a mystery as both the actors never accepted their relationship in public.

Is Amitabh Bachchan Hindu?

The Bachchan family are Indian Awadhi Hindu Chitraguptavanshi Kayasthas fluent in several Hindustani languages (Awadhi, Hindi, Urdu) as well as Persian.

Leave a Reply