मुलं मुली आता खांद्याला खांदा लावून बरोबरीचे शिक्षण घेत आहेत. तो मुलींचाही हक्क आहेच. काहीवेळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरात मुलीचा जन्म झाला तर पैश्या अभावी तिचे शिक्षण मागे राहते. मुलींनीही चांगले शिकले पाहिजे आणि शिक्षणाची इच्छा पूर्ण केली पाहिजे यासाठी ही free education ची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा उद्देश हाच आहे की, कोणत्याही मुलीचे शिक्षण फक्त पैसे नाहीत म्हणून थांबू नये. महाराष्ट्र सरकारने हाच विचार करून मुलींना free education मिळण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ही योजना महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर सर्व विभागातील मुलींना यात पात्र ठरवण्यात येणार आहे. या योजनेमुळे बहुतांश मुलींना याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील OBC, EWS, SEBC प्रवर्गातील मुलींना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. चला तर बघूया या योजनेची संपूर्ण माहिती.
Free Education Scheme (Maharashtra) Purpose
- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मुलीला तिची इच्छा असेल तेवढे शिक्षण घेता यावे आणि आपले स्वप्न मध्येच सोडावे लागू नये म्हणून ही योजना आणण्यात आली आहे.
- गरीब कुटुंबातील मुलींना मध्येच शिक्षण सोडून कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीसाठी काहीतरी काम करावे लागते. आपल्या शिक्षणाचा भार कुटुंबावर पडू नये आणि कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काहीतरी मार्ग काढता यावा यासाठी मुली शिक्षण अर्धवट सोडतात. हे असे घडू नये हा देखील एक हेतू या योजने मागे आहे.
- या योजनेमुळे अनेक मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित होणार आहेत.
- या योजनेमुळे लैंगिक समता निर्माण होणार आहे आणि मुलांप्रमाणेच योग्य दर्जा मुलींनाही मिळणार आहे.
- जास्तीत जास्त मुलींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने यासाठी वयाची अट ठेवलेली नाही.
Beneficiary girls for free education scheme
- ही योजना फक्त राज्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आहे. ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे.
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या मुलींना मिळणार आहे.
- ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे.
- लाभार्थी मुलगी शिक्षण घेत आहे याचे पुरावे असावे. त्याचप्रमाणे चालू वर्षाचे शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड certificate असावे.
Documents to avail free education scheme
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट size फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- बोनाफाईड certificate
- गुणपत्रक (marksheet)
- शाळा सोडल्याचा दाखला
- डोमेसाईल certificate
Free Education Scheme Application Process
या योजने अंतर्गत जर मुलींना शिक्षण घ्यायचे असेल तर महाराष्ट्रात कोठेही अर्ज करण्याची गरज नाही. या संबंधीची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने संबंधित विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडे दिली आहे. त्यामुळेच जर या योजने अंतर्गत विद्यार्थिनी पात्र असतील तर आपोआप त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या संबंधी सूचना मुलींना त्यांच्या त्यांच्या कॉलेजकडून मिळेल.
फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही आवश्यक कडगपत्रे सांगितली गेली आहेत ती मुलीकडे असणे गरजेचे आहे. योग्य आणि सगळी कागदपत्रे असतील तर नक्कीच मुलींना या योजने अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात येईल.
Highlights of the Free Education Order
- राज्यात व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण ३६ टक्के
- उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यपालन विभागासाठी आदेश लागू
- शासकीय, अनुदानित अशासकीय, अशंत: अनुदानित, कायम विनाअनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठ (खासगी अभिमत व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत
- आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्गातील आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित व पूर्वीपासून प्रवेशित (अर्जांचे नुतनीकरण केलेल्या) मुलींना मोफत शिक्षण मिळणार
- दरवर्षी ९०६.०५ कोटींचा भार शासन उचलणार; महिला व बालविकास विभागाकडील अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार
FAQ
१. मोफत शिक्षण योजनेचा फायदा काय?
मोफत शिक्षण योजने अंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी एक रुपयाही खर्च न करता शिक्षण घेता येणार आहे.
२. मोफत शिक्षण योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?
या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शिक्षण घेणाऱ्या मुलींना होणार आहे.
मोफत शिक्षण योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि त्यामुळेच ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. फक्त महाराष्ट्रातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
2 thoughts on “आता मुलींना इच्छा असेपर्यंत free education घेता येणार, महाराष्ट्र शासन निर्णय २०२४”