Maruti Wagon R Waltz:- मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. याच कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Wagon च्या Waltz एडिशनला लाँच केले आहे. या कारच्या डिझाईनमध्ये बरेच बदल करत कंपनीने या गाडीला एक दमदार लूक दिला आहे. Regular गाडीच्या तुलनेत या गाडीत केलेल्या कॉस्मेटिक बदलांमुळे या गाडीला एक स्पोर्टी लूक मिळत आहे. या फॅमिली कारची एक्स शोरुम किंमत फक्त आणि फक्त 5.65 लाख ठेवण्यात आली आहे.
नुकतेच आता गणपती विसर्जन झाले आहेत आणि पुढे नवरात्री, दसरा, दिवाळी असे शुभ मुहूर्त येत आहेत. अश्या सणांच्या वेळी भारतीय बाजारपेठ नवनवीन वस्तूंनी गजबजलेली असते. बरेच मोठे मोठे ब्रँड आपल्या उत्पादनावर सवलत देतात किंवा काहीतरी नवीन product बाजारात आणतात. गाड्या, बाईक, मोबाईल अश्या वस्तू सणांच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्या जातात.
भारतात बहुतांश सहसा अशी मोठी खरेदी सणांच्या अश्या शुभ मुहूर्तावर करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर आता Maruti Wagon R Waltz ही गाडी लाँच झाली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीने ही लिमिटेड एडिशन गाडी लाँच केली आहे.
कार उत्पादन क्षेत्रातील एक नावाजलेले आणि विश्वासार्ह नाव म्हणजे Maruti Suzuki. Maruti ने त्यांच्या लोकप्रिय Wagon R गाडीचे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. यात प्रीमियम लूक, परवडणारी किंमत आणि स्पेशल फीचर्स देण्यात आले आहेत.
Features of Maruti Wagon R Waltz Car
6.2-इंच टचस्क्रीन म्युझिक सिस्टम, फ्रंट क्रोम ग्रिल, फॉग लॅम्प, व्हील आर्क क्लॅडिंग, बंपर प्रोटेक्टर, साइड स्कर्ट, बॉडी साइड मोल्डिंग आणि कारच्या केबिनमध्ये नवीन डिझायनर फ्लोअर मॅट्स आणि सीट कव्हर्स, नवीन टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम, स्पीकर्स, सिक्युरिटी सिस्टीम आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरासह इंटिरियर स्टाइलिंग किट असे बरेच काही फीचर्स या कारमध्ये पाहायला मिळत आहेत.
Safety Features Of Maruti Wagon R Waltz
Wagon R Waltz गाडीत काही नवीन safety Features देण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) अश्या काही नव्या safety Features ने ही कार सुसज्ज आहे.
Specifications Of Maruti Wagon R Waltz Car
Wagon R Waltz एडिशन सादर करताना कंपनीने 1 लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय सादर केले आहेत. याशिवाय कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्येही ही गाडी सादर करण्यात आली आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार त्याचं पेट्रोल व्हेरियंट 25.19 किमी/लीटरचे आणि CNG प्रकार 33.48 किमी/किलो मायलेज देते.
Wagon R Waltz Variants
ही गाडी तीन तीन व्हेरियंट्स LXi, VXi आणि ZXi मध्ये सादर करण्यात आले आहे परंतु व्हेरियंटनुसार किमती अजून उघड करण्यात आलेल्या नाहीत.
ही नवी R Waltz आवृत्ती लाँच करण्यामागचे कारण
मारुती सुझुकीने, वॅगन आरच्या यशाचा आनंद साजरा करत वॉल्ट्जची मर्यादित आवृत्ती लॉन्च केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मारुती सुझुकी लॉन्च झाल्यापासून वॅगन आरच्या 32.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि टॉल-बॉय हॅचबॅक कार निर्मात्यासाठी क्रमांक मिळवला आहे.
मारुतीचे म्हणणे आहे की वॅगन आर वॉल्ट्झ (Wagon R Waltz) एडिशन हे मर्यादित-रन मॉडेल आहे परंतु याचे किती युनिट्स उपलब्ध असतील किंवा किती काळ विक्रीसाठी हे मॉडेल असतील हे अद्याप उघड केले गेले नाही.
नवी Maruti Wagon R Waltz ची स्पर्धा
ही गाडी प्रामुख्याने टाटा टियागो आणि सिट्रोएन सी3 सारख्या गाड्यांसोबत स्पर्धा करेल.
New Maruti Wagon R Waltz Variants and features chart
Variants | Millage |
Petrol variant | 25.19 km/ltr |
CNG variant | 33.48 km/kg |
Wagon R LXI Waltz Edition
Engine | 998cc |
Power | 65.71 bhp |
Transmission | Manual |
Millage | 24.35 kmpl |
Fuel | Petrol |
Boot Space | 341 Liters |
Ex Showroom price | Rs. 564671/- |
जर तुम्हीही या सणांच्या दिवसात तुमच्या कुटुंबासाठी एक कार खरेदी करू इच्छित असाल तर नक्कीच Maruti च्या या लिमिटेड एडिशन, स्पेशल फीचर्स आणि परवडणारी किंमत असलेल्या या Wagon R Waltz चा विचार करायला हरकत नाही.
FAQ
Is Wagon R a good family car?
An excellent choice for middle-class families
What is the size of Wagon R 2024?
3655 mm Length, 1620 mm Width, 1675 mm Height, 2435 mm Wheelbase, 165 mm Ground Clearance
What is the maximum life of Wagon R?
300k kms.
Why is Wagon R so popular?
perfect combination of space, fuel efficiency, reliability, affordable maintenance, and brilliant resale value makes it popular.
3 thoughts on “सर्वसामान्यांना परवडणारी Maruti Wagon R Waltz फक्त 5.65 लाखात झाली लाँच”